Bajarang Sonawane : 'आधी आपल्या बुडाखाली काय जळतंय ते पाहावं,' बजरंग सोनवणेंचा धनंजय मुंडेंवर घणाघात

Dhananjay Munde latest political controversy : खासदार बजरंग सोनवणे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीका करत आधी परळी मतदारसंघातील प्रश्नांकडे लक्ष द्यावे, असा सल्ला दिला. बीड जिल्ह्यातील राजकारण पुन्हा तापले आहे.
Bajarang Sonawane : 'आधी आपल्या बुडाखाली काय जळतंय ते पाहावं,' बजरंग सोनवणेंचा धनंजय मुंडेंवर घणाघात
Published on
Updated on

Beed Politics : विलास घुले यांची हत्या दुर्दैवीच आहे, त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. पण या विषयावरून जातीय राजकारण करणाऱ्या परळीच्या आमदारांनी आधी आपल्या बुडाखाली किती अंधार आहे? हे पाहिलं पाहिजे, उगाच जिल्ह्याचा नेता होण्याचा प्रयत्न त्यांनी करू नये, ते आता शक्य नाही, अशा शब्दात धनंजय मुंडे यांच्यावर हल्लाबोल केला.

विलास घुले यांना न्याय मिळवून देण्यासाठी तुम्ही हा विषय सभागृहात मांडला, आणखी मांडणार आहात असे सांगता पण मग तुमच्याच परळीतील तोहीद खान, महादावे मुंडे प्रकरणावरही बोला, त्यावर का बोलत नाही? असा टोला लगावला. 20 जून रोजी केज तालुक्यातील टाकळी येथे विलास घुले या तरूण हाॅटेल चालकाचा एका टोळक्याच्या चाकू हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला.

Bajarang Sonawane : 'आधी आपल्या बुडाखाली काय जळतंय ते पाहावं,' बजरंग सोनवणेंचा धनंजय मुंडेंवर घणाघात
Sia Goyal case : कोर्टाच्या आवारातच हायव्होल्टेज ड्रामा! सिया गोयलच्या वकीलपत्रावरून दोन वकिलांमध्ये वाद..

आरोपींच्या अटकेसाठी केज तालुक्यात ग्रामस्थ आणि घुले कुटुंबियांनी मोठे आंदोलन उभारले. खासदार बजरंग सोनवणे यांचा मुलगा सौरभ याचा या प्रकरणात हात आहे, तोच या कटाचा सुत्रधार आहे, असा आरोपही रमेश घुले व कुटुंबियांनी केला. एसआयटीच्या पथकाने चार तास सौरभ सोनवणे याची चौकशीही केली. या प्रकरणावरून खासदार बजरंग सोनवणे, आमदार धनंजय मुंडे यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. या पार्श्वभूमीवर बजरंग बाप्पा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर पुन्हा निशाणा साधला. बापू आंधळे खून प्रकरणात बबन गीते यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना अडकवण्यात आले.

लोकसभेच्या निवडणुकीत गीते यांनी माझे काम केले म्हणून त्यांना अडकवण्यात आल्याचा गंभीर आरोप सोनवणे यांनी केला आहे. ज्या रमेश घुले यांची बाजू घेऊन परळीचे आमदार बोलत आहेत, त्याच्यावर किती गंभीर गुन्हे दाखल आहेत हे सोशल मिडियाच्या माध्यमातून समोर आले आहे. महादेव मुंडे, तोहिद खान याच्या खूनचा प्रकरण ताजे आहे. या विषयावर आमदारांना कधी सभागृहात बोलावे वाटले नाही.

मी या प्रकरणात जात आणू इच्छित नाही. पण तुम्ही इथे जातीचे राजकारण करता मग आज ज्या मराठा भगिनीने उमेश माने, विलास घुले यांच्या संदर्भात तक्रार केली आहे, तिच्या पाठीशी आम्ही मराठा म्हणून का उभे राहू नये? असा सवालही बजरंग सोनवणे यांनी केला. विलास घुले हत्या प्रकरणातील फिर्यादी रमेश घुले याच्यावर यापूर्वीच बलात्कार, अपहरण, खंडणी, जीवे मारण्याचा प्रयत्न यांसारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. खोट्या तक्रारींच्या आधारे आमच्यावर आरोप करणारे हे लोक स्वतः किती 'चारित्र्यवान' आहेत, हे त्यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांवरून स्पष्ट होते, अशी टीकाही बजरंग सोनवणे यांनी केली.

Bajarang Sonawane : 'आधी आपल्या बुडाखाली काय जळतंय ते पाहावं,' बजरंग सोनवणेंचा धनंजय मुंडेंवर घणाघात
Vilas Ghule Case : विलास घुले हत्या प्रकरणाला वेगळे वळण; अत्याचार करत जीवे मारण्याच्या धमकी दिल्याचा महिलेचा आरोप!

विरोधकांना सर्वसामान्यांवर आणि आमच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्याची सवयच जडली असून वेळ आल्यावर मी सर्वांचे कारनामे आणि काळे धंदे दमादमाने पुराव्यासह उघड करणार, असा इशारा त्यांनी दिला आहे. या संपूर्ण प्रकरणात आपली नाहक राजकीय बदनामी केली गेल्यामुळे आपण या विरोधात उच्च न्यायालयात (हायकोर्ट) रिट याचिका दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगीतले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com