Sia Goyal case : कोर्टाच्या आवारातच हायव्होल्टेज ड्रामा! सिया गोयलच्या वकीलपत्रावरून दोन वकिलांमध्ये वाद..

Sia Goyal High voltage drama in court premises : सिया गोयल यांच्या वकीलपत्रावरून न्यायालय परिसरात दोन वकिलांमध्ये तीव्र वाद झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे काही काळ न्यायालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
Sia Goyal lawyer controversy
Sia Goyal lawyer controversySarkarnama
Published on
Updated on

Pune News : बहुचर्चित केतन अग्रवाल हत्या प्रकरणाला आता एक वेगळंच वळण लागलं असून, कोर्टाच्या आवारातच दोन नामवंत वकिलांमध्ये मोठा ड्रामा पाहिला मिळाला. मुख्य आरोपी सिया गोयल हिला न्यायालयात हजर करण्यापूर्वीच, तिचं वकीलपत्र नेमकं कोण घेणार? यावरून ॲडव्होकेट विपुल दुशिंग आणि ॲडव्होकेट श्रीवास्तव यांच्यात थेट कोर्टाबाहेरच कलगीतुरा रंगल्याचे पाहिला मिळालं.

या दोन्ही वकिलांनी आपल्यालाच सियाने अधिकृत म्हणून वकील पत्र दिल्याचा दावा केला. त्यामुळे सियाची बाजू आपण कोर्टामध्ये मांडणार असल्याचे देखील या वकिलांकडून सांगण्यात आलं यावेळी ॲडव्होकेट विपुल दुशिंग यांनी सांगितले. "सिया गोयल हिच्या सख्ख्या भावाने आणि तिच्या कुटुंबियांनी स्वतः माझ्याशी संपर्क साधून या केसची सर्व सूत्रं माझ्याकडे सोपवली आहेत.

Sia Goyal lawyer controversy
BARTI UPSC Scheme: UPSC मुख्य परीक्षा 2026 पात्र SC उमेदवारांना 50 हजारांची मदत; जाणून घ्या अटी आणि अंतिम तारीख

तिच्या भावाने या संदर्भात न्यायालयात अधिकृत प्रतिज्ञापत्र देखील सादर केलं आहे, "आरोपी सध्या पोलीस कस्टडीत असताना वकीलपत्रावर सही घेण्याची एक ठरलेली कायदेशीर प्रक्रिया असते. आम्ही न्यायालयाची रीतसर परवानगी घेऊन, तपास अधिकाऱ्यांच्या समोर कायदेशीर मार्गाने सियाची सही घेतली आहे. त्यामुळे आमचंच वकीलपत्र वैध आहे," असंही त्यांनी स्पष्ट केलं.

दुसरीकडे, ॲडव्होकेट श्रीवास्तव यांनी आपण पोलीस स्टेशनला जाऊन आधीच सही आणल्याच्या दाव्यावर आक्षेप घेत दुशिंग यांनी सांगितले की कोणत्याही अधिकृत परवानगीशिवाय किंवा कोर्टाच्या शिक्क्याशिवाय आणलेलं वकीलपत्र कायदेशीररीत्या कसं टिकणार?

Sia Goyal lawyer controversy
Vilas Ghule Case : विलास घुले हत्या प्रकरणाला वेगळे वळण; अत्याचार करत जीवे मारण्याच्या धमकी दिल्याचा महिलेचा आरोप!

सिया ही सज्ञान असून तिचा वकील कोण असावा, हा सर्वस्वी तिचा आणि तिच्या कुटुंबियांचा निर्णय आहे आणि त्यांनी मला वकील एकत्र दिला आहे असं दुशिंग यांनी सांगितलं. तर दुसरीकडे श्रीवास्तव यांनी देखील आपल्याकडे अधिकृत परवानगी असून वेळ पडल्यास आम्ही दोघे मिळून की केस पुढे चालू असं सांगितलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com