Latest Update Beed Lok Sabha : ‘राष्ट्रवादी’च्या बजरंग सोनवणेंनी घेतले शिवसंग्रामच्या डॉ. ज्योती मेटेंचे आशीर्वाद

Bajrang Sonawane : डॉ. मेटे यांची शिवसंग्रामच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीबद्दल बजरंग सोनवणे यांनी त्यांचा सत्कार केला. डॉ. मेटे यांनीही सोनवणेंना बुके देत त्यांचे स्वागत केले.
Bajrang Sonawane
Bajrang Sonawane Sarkarnama

Beed Loksabha Constituency : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे लोकसभेचे उमेदवार बजरंग सोनवणे Bajrang Sonavane यांनी शिवसंग्रामच्या प्रमुख डॉ. ज्योती मेटे (Jyoti Mete) यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. डॉ. मेटे यांची शिवसंग्रामच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीबद्दल बजरंग सोनवणे यांनी त्यांचा सत्कार केला. डॉ. मेटे यांनीही सोनवणेंना बुके देत त्यांचे स्वागत केले. loksabha Election 2024

बीड लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीच्या सुरुवातीला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारीसाठी डॉ. ज्योती मेटे यांच्या नावाचीही चर्चा होती. त्यानंतर बजरंग सोनवणे यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. दरम्यान, बजरंग सोनवणे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आपण निवडणुक लढविणार असे डॉ. ज्योती मेटे यांनी जाहीर केले होते. त्यांनी लोकसभा मतदार संघाच्या विविध भागांचा दौराही केला. त्यांच्या दौऱ्यात समर्थकांचा त्यांना प्रतिसादही होता आणि त्यांनी निवडणूक लढवावी, असा आग्रह देखील होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Bajrang Sonawane
Arjun Khotkar News : दानवेंच्या गळाभेटीनंतरही खोतकरांचे 'वेट अ‍ँड वॉच'

वंचितनेही त्यांना उमेदवारीसाठी हात पुढे केला होता. दरम्यान, मतांची विभागणी टाळण्यासाठी आपण निवडणूक लढविणार नाही, असे डॉ. ज्योती मेटे यांनी जाहीर केले. गेल्या आठवड्यात पुण्यात शिवसंग्रामच्या बैठकीत लोकसभा निवडणुकीत तटस्थ राहण्याचा निर्णय झाला आहे. दरम्यान, शुक्रवारी बजरंग सोनवणे यांनी डॉ. ज्योती मेटे यांची शिवसंग्राम भवनात जाऊन भेट घेतली. त्यांनी डॉ. ज्योती मेटे यांचे आशीर्वाद घेतले. ‘माझ्या जीवनात मी ज्यांना प्रेरणास्थानी मानले, असे माझे पाठीराखे, माझे आदर्श दिवंगत विनायकराव मेटे यांचा वारसा सक्षमपणे चालवणाऱ्या डॉ. ज्योती मेटे यांची सदिच्छा भेट घेऊन आशिर्वाद घेतली, जनभावना लक्षात घेत बीड लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय रद्द करण्याचे औदार्य त्यांनी दाखवले, त्याबद्दल त्यांचे अंत:करणपूर्वक आभार मानले. शिवसंग्राम संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन करत त्यांचे आदरातिथ्य स्वीकारले’ अशी पोस्ट बजरंग सोनवणे यांनी सोशल मीडियावर केली आहे.

यादरम्यान, शिवसंग्रामचे व दिवंगत विनायक मेटे यांच्या समर्थकांचे जिल्हाभरात कार्यकर्त्यांचे जाळे आहे. डॉ. ज्योती मेटे यांनी तटस्थ अशी भूमिका घेतली असली तरी या भेटीमुळे मेटे समर्थकांची सहानुभूती बजरंग सोनवणे यांच्याकडे वळण्यास मदत होणार असल्याचे मानले जाते. मागच्या निवडणुकीत देखील दिवंगत विनायकराव मेटे यांनी महायुतीत असतानाही उघडपणे बजरंग सोनवणे यांचा प्रचार केला होता.

Bajrang Sonawane
Raosaheb Danve News : तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून करमेना; नाराज खोतकर दानवेंच्या प्रचारात सक्रिय होणार?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com