Arjun Khotkar News : दानवेंच्या गळाभेटीनंतरही खोतकरांचे 'वेट अ‍ँड वॉच'

Jalna Loksabha News: ऐन निवडणुकीच्या काळात दानवे- खोतकर यांच्यात मतभेद दिसत होते. पण रावसाहेब दानवेंनी अर्जून खोतकर यांची भेट घेऊन नाराजी नाट्याच्या चर्चांवर पूर्णविराम दिला आहे. मात्र, तरी सुद्धा अर्जून खोतकर 'वेट अ‍ॅड वॉच'च्या भूमिकेत आहेत.
Arjun Khotkar, Raosaheb Danve
Arjun Khotkar, Raosaheb Danve Sarkarnama
Published on
Updated on

Raosaeb Danve News : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या भाजपने प्रचाराची मोट बांधली आहे. संपूर्ण महाराष्ट्रभरात प्रचार सभांचा धडाका सुरु आहे. महाराष्ट्रात महायुती झाली खरी पण एकूनच शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटात आणि भाजप नेत्यांमध्ये कुरबूरी पाहायला मिळत आहे. अशातच केंद्रीय मंत्री, जालन्याचे लोकसभा उमेदवार रावसाहेब दानवे आणि शिवसेना ( शिंदे गट ) उपनेते अर्जुन खोतकर यांच्यात निवडणुकीच्या काळात ( Lok Sabha Election 2024 ) मतभेद दिसत होते. पण रावसाहेब दानवेंनी अर्जून खोतकर (Arjun Khotkar) यांची भेट घेऊन नाराजी नाट्याच्या चर्चांवर पूर्णविराम दिला आहे.

रावसाहेब दानवेंनी घेतली अर्जुन खोतकर यांची गळाभेट, मात्र अजूनही खोतकर नाराज?

रविवारी जालना येथे झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024 ) एका प्रचार कार्यक्रमात खोतकर आणि दानवे हजर होते. पण, त्यांनी एकमेकांशी अबोला ठेवला. तसेच ऐन निवडणुकीच्या काळात अर्जुन खोतकर दानवेंच्या प्रचारात दिसत नव्हते. त्यामुळे महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये चिंता वाढली होती. दानवेंच्या (Raosaheb Danve) प्रचाराचा नाराळ फोडण्याच्या कार्यक्रमाला खोतकरांनी दांडी मारली होती. त्यामुळे खोतकर दानवेंच्या कार्यपध्दतीवर नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं.

Arjun Khotkar, Raosaheb Danve
Raosaheb Danve News : तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून करमेना; नाराज खोतकर दानवेंच्या प्रचारात सक्रिय होणार?

परंतु, गुरूवारी ( 2 मे ) अर्जुन खोतकर यांच्या 'दर्शना' निवासस्थानी जात रावसाहेब दानवे यांनी त्यांची भेट घेतली. या दोघांची बऱ्याच काळानंतर भेट झाली. या भेटी दरम्यान तब्बल दोन तास चर्चा केल्यानंतर अर्जुन खोतकर यांची नाराजी दूर झाल्याचं बोललं जात आहे. दानवेंनी खोतकरांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे खोतकर आता दानवे यांच्या प्रचारात सक्रिय होतात का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

या भेटीनंतर दानवे म्हणाले, 'आमच्यात काही व्यक्तिगत वाद नव्हते. खोतकर लग्न समारंभात व्यस्त असल्यामुळे प्रचारात सहभागी झाले नाहीत. मात्र उद्यापासून ते माझ्यासोबत प्रचारात दिसणार असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली.

दरम्यान, 'माझी कोणतीही नाराजी नसून प्रचारात उतरण्याबाबत मी दोन दिवसानंतर वरिष्ठांना विचारून निर्णय घेईन अशी प्रतिक्रिया खोतकर यांनी या भेटीवर दिली आहे. आता पुढे खोतकर दानवेंच्या प्रचारासाठी मैदानात उतरणार का ? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Arjun Khotkar, Raosaheb Danve
Beed Loksabha Constituency : चिमुकल्याने बजरंग सोनवणेंना दिला पैशांचा 'गल्ला', तर महिलांनी काढली रांगोळीतून 'तुतारी'

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com