Bajrang Sonwane, Deepa Mudhol - Munde
Bajrang Sonwane, Deepa Mudhol - MundeSarkarnama

Bajrang Sonwane News : बीडमध्ये ट्विस्टवर ट्विस्ट; सोनावणेंचं निवडणूक आयोगाला पत्र, जिल्हाधिकाऱ्यांबाबत मोठी मागणी

Deepa Mudhol - Munde : बीडमधील बोगस मतदानाचे एकापाठोपाठ एक असे अनेक व्हिडिओही बाहेर आल्यानंतर निवडणूक आयोगाने जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्याकडे खुलासा मागितला. त्यांनी मात्र जिल्ह्यात बोगस मतदान झाले नसल्याचा दावा केला.

Beed Political News : बीड लोकसभा मतदारसंघ विविध कारणांनी राज्यभर सतत चर्चेत राहिला आहे. या मतदारसंघात सर्वाधिक मतदान झाल्याची नोंद झाली आहे. मात्र याच बीडमध्ये मोठ्या प्रमाणात बोगस मतदान झाल्याचे आरोपही होत आहे. यावरून महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे आणि अजित पवार गटाचे नेते धनजंय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यानंतर सोनवणे यांनी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्याबाबत निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी केली आहे. Bajrang Sonwane News

लोकसभा निवडणूक जाहीर होण्याआधीपासूनच बीडच्या राजकीय वातावरणात मोठ्या घडामोडी घडल्या. या मतदारसंघात आरक्षणावरून मराठा आणि ओबीसी समाज आक्रमक झाला होता. ओबीसी नेते छगन भुजबळ आणि मराठा नेते मनोज जरांगेंच्या विधानांनी राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. येथून भाजपने पंकजा मुंडे Pankaja Munde तर शरद पवार गटाने बजरंग सोनवणे यांना उमेदवारी जाहीर केली. ही लढतीला ओबीसी विरुद्ध मराठा असा रंग मिळाल्याने ऐन मतदानादिवशी बीडमध्ये वादग्रस्त घटना घडल्या.

बीडमध्ये अनेक मतदान केंद्रावर बोगस मतदान झाल्याचा आरोप ज्येष्ठ नेते शरद पवारSharad Pawar यांच्यासह बजरंग सोनवणेंनी केला आहे. त्याबाबतचे त्यांनी एकापाठोपाठ एक असे अनेक व्हिडिओही जाहीर केले. बीडमधील या प्रकाराबाबत निवडणूक आयोगाने जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्याकडे खुलासा मागितला. त्यांनी मात्र जिल्ह्यात बोगस मतदान झाले नसल्याचा दावा केला. यावरून सोनवणे यांनी आयोगाला जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांना बीडच्या मतमोजणीच्या प्रक्रियेत सहभागी होऊ देऊ नये, अशी वेगळीच मागणी केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Bajrang Sonwane, Deepa Mudhol - Munde
West Bengal Politics : काँग्रेसमध्ये प्रेम, भाजपमध्ये घटस्फोट; मतपेटीत कैद झाले पूर्वीश्रमीच्या पती-पत्नीचे भविष्य...

याबाबत सोनवणेंनी Bajrang Sonwane निवडणूक आयोगाला पत्र दिले आहे. त्या पत्रात म्हटले, की जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बोगस मतदान झाले तरी याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. त्यामळे आता आयोगाने जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे, परळीचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे आणि पोलिस निरीक्षक दहिफळे यांना मतमोजणीच्या प्रक्रियेत सहभाग देऊ नये. हे सर्व अधिकारी बीड जिल्ह्यातीलच रहिवाशी आहेत. त्यामुळे त्यांचा मतमोजणी प्रक्रियेवर मोठा परिणाम होईल, याकडेही सोनवणेंनी लक्ष वेधले. तसेच बीडमधील प्रशासकीय यंत्रणा ही पालकमंत्री धनंजय मुंडेंच्या Dhananjay Munde दबावाला बळी पडत असल्याचा आरोप करत सोनवणेंनी आता निवडणूक आयोगानेच न्याय द्यावा, अशी मागणीही केली आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Bajrang Sonwane, Deepa Mudhol - Munde
Shantigiri Maharaj News : नाशिकनंतर शांतीगिरी महाराज आता वाराणसीच्या मैदानात; पंतप्रधान मोदींसाठी...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com