Bajrang Sonwane News : 'वारसाहक्काने आलेल्या २६ कारखान्यांचे त्यांनी...' ; बजरंग सोनवणेंनी लगावला टोला!

Beed Lok Sabha Constituency : 'आपण ‘शेतकरी पुत्र’ असून विरोधक सोन्याचा चमचा तोंडात घालून जन्मले असं म्हणतात,' असंही सोनवणेंनी मुंडे बंधू-भगिनींना उद्देशून म्हटले आहे.
Bajrang Sonwane News : 'वारसाहक्काने आलेल्या २६ कारखान्यांचे त्यांनी...' ; बजरंग सोनवणेंनी लगावला टोला!
Sarakarnama

Beed Loksabha Election : 'धनंजय मुंडे माझ्या शेतीला साक्षीदार आहेत. त्यांनी आपली शेती पाहिलेली आहे. त्यामुळे त्यांना मी कसला शेतकरी हे माहिती आहे. आपण मात्र त्यांच्या खासगी बाबींवर बोलणार नाही', असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणे म्हणाले.

'मला शेती वारसाहक्काने मिळालेली आहे. आजही आपले वडील शेती करतात, शेतात राहतात. पण, त्यांना वारसाहक्काने २६ कारखाने आले आणि त्यांनी शुून्य केले, असा टोला बजरंग सोनवणे यांनी नाव न घेता प्रतिस्पर्धी भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे(Pankaja Munde) यांना लगावला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

इंडिया आघाडीचे बीड लोकसभेचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणे सोमवारी आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. याबाबत त्यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली. बजरंग सोनवणे प्रचारात आपण ‘शेतकरी पुत्र’ असून, विरोधक सोन्याचा चमचा तोंडात घालून जन्मले असे म्हणतात, याबाबत धनंजय मुंडे(Dhananjay Munde) यांनी ‘ते कसली शेती करतात, त्यातून काय पिकते हे आपल्याला माहीत आहे,’ असा टोला लगावला होता. त्यावर बजरंग सोनवणेंनी वरील उत्तर दिले.

बजरंग सोनवणे म्हणाले, आपण प्रचारात फिरत असताना लोकांचे प्रेम आणि प्रतिसाद मिळत आहे. आता उन्हाचा तडाखा असल्याने आपण लोकांना त्रास होऊ नये म्हणून उमेदवारी अर्ज भरताना कुठलेही शक्तिप्रदर्शन करणार नाही. तसेच, आपण गरिब उमेदवार असल्याचेही त्यांनी मिश्किलपणे सांगितले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार रजनी पाटील यांच्यासह शिवसेना व इंडिया आघाडीतील पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत.

आमदार संदीप क्षीरसागर, माजी आमदार उषा दराडे, सय्यद सलिम, राजेसाहेब देशमुख, परमेश्वर सातपुते, गणेश वरेकर, रत्नाकर शिंदे, अजिंक्य चांदणे, हेमलता पिंपळे, नामदेव चव्हाण, अजय बुरांडे आदी इंडिया आघाडी पक्षातील नेत्यांची उपस्थिती होती.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com