Beed Loksabha Election News : राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत माजी जिल्हाध्यक्ष व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बजरंग सोनवणे यांनी बुधवारी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. पक्षाध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार व बीडचे जिल्हाध्यक्ष संदीप क्षीरसागर आदींनी पुणे येथे सोनवणेंना पक्षात प्रवेश दिला. लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचाच उमेदवार विजयी होईल, असा विश्वाही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) व पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे बजरंग सोनवणे मागच्या काही महिन्यांपासून पक्षात नाराज होते. त्यांच्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेशाच्या चर्चा होत्या. दरम्यान, त्यांनी तिरुपती बालाजी, जेजुरीचा खंडेरायाचे दर्शन घेत बुधवारी समर्थकांसह पुणे गाठले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मागच्या वेळी आपण तगडी लढत दिली. मात्र, पराभव झाला असला तरी त्याची कसर या निवडणुकीत भरुन काढू, कोणीही उमेदवार असला तरी तुतारीचा निनाद वाजणारच असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मागच्या वेळी शरद पवारांमुळेच (Sharad Pawar) आपल्याला उमेदवारी मिळाली होती.
आमदार संदीप क्षीरसागर(Sandeep Kshirsagar) व आमदार प्रकाश सोळंके यांनी आपली बाजू लावून धरली होती याची आठवणही त्यांनी करुन दिली. आपण पक्षात कोणत्या पदासाठी नाही तर शेतकऱ्यांच्या हिताचे काम करण्यासाठी आल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून लोकसभा निवडणुक लढविणार अशी त्यांची चर्चा असतानाच शिवसंग्रामच्या डॉ. ज्योती मेटे यांचे नाव पुढे आले. त्यामुळे सोनवणेंना या उमेदवारीबाबत संभ्रम असला तरी नेतृत्व विस्ताराची त्यांना संधी आहे. केज मतदार संघात त्यांचे पक्षात एकहाती वर्चस्व राहू शकते. त्यांच्या संघटन कौशल्यामुळे संघटनेत जिल्हाध्यक्षपदाबाबतही विचार होऊ शकतो.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.