Bajrang Sonwane On Hake: 'लक्ष्मण हाकेंना बीडमधून निवडणुक लढवायची...' ; खासदार बजरंग बाप्पा सोनवणे यांचं मोठं विधान

Beed News : ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी गेवराईमध्ये ओबीसी महाएल्गार मेळाव्यात बीडचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे यांच्यावर जोरदार टीका केली होती.
Bajrang Sonwane On hake .jpg
Bajrang Sonwane On hake .jpgSarkarnama
Published on
Updated on

Beed News: ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी गेवराईमध्ये ओबीसी महाएल्गार मेळाव्यात बीडचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे यांच्यावर जोरदार टीका केली होती. माजलेल्या लोकांना घरी बसवायचे आहे. चंदनचोर सोनवणे तुझं शिक्षण किती रे असं म्हणत शाब्दिक हल्ला चढवला होता. सबका हिसाब बराबर होगा असा इशाराही हाके यांनी दिला होता. आता हाके यांच्या टीकेला खासदार बजरंग सोनवणे (Bajrang Sonwane) यांनी जशास तसं प्रत्युत्तर दिले आहे.

बीडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार बजरंग सोनवणे यांनी ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंना बीडमधून निवडणुक लढवायची असेल, म्हणून ते सध्या बीड जिल्हा दौऱ्यावर जास्त आहेत, असा मिश्किल टोला लगावला आहे. हाके हे बीड जिल्हा दौऱ्यावर जास्त फिरत आहेत, कारण त्यांना येथून आगामी निवडणुका लढवायच्या आहे,असा चिमटा सोनवणे यांनी हाकेंना काढला.

लक्ष्मण हाकेंची टीका काय?

लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी आमदार विजयसिंह पंडित, प्रकाश सोळंके आणि बजरंग सोनवणे यांना तुझ्यात लई दम आहे ना, तर फक्त राजीनामा द्या, असे आव्हान दिले होते.आमची माणसं तुझ्या मागे आली नसती, तर तुम्ही निवडून आला असता का? असा सवालही हाके यांनी आमदार विजयसिंह पंडित यांना केला. तुम्ही आडवे या. हा महाराष्ट्र कुणाचा ते दाखवू असा इशारा हाकेंनी दिला आहे. 

मुंबईला लाखोंच्या संख्येने जायचे आहे. आपली माणसं तारीख ठरवतील. इथून पुढे महाराष्ट्र एकच बघेल ओबीसी म्हणजे काय? असे हाके म्हणाले. 

Bajrang Sonwane On hake .jpg
Election Commission EVM: निवडणूक आयोगाचा सर्वात मोठा निर्णय; शरद पवारांच्या उमेदवारांना लोकसभा अन् विधानसभेला बसला होता फटका

लक्ष्मण हाके यांनी मराठा आरक्षणाचा काढलेला जीआर हा ओबीसींचे आरक्षण संपवणारा असून यापुढे आम्ही दांडकं नाही तर कोयते काढू असा इशारा दिला आहे. बंजारा समाजानेही आता वेगळं आरक्षण न मागता ओबीसींची एकजूट राखावी, कुणीही ओबीसींमध्ये फूट पडेल असं कृत्य करू नये असंही हाकेंनी यांनी म्हटलं आहे.

Bajrang Sonwane On hake .jpg
Ajit pawar Controversy : IPS अंजना कृष्णा प्रकरणामुळे अडचणीत,अजितदादांनी बावनकुळेंसमोरच बाहेर काढली सगळी खदखद

लक्ष्मण हाके म्हणाले,आमचा मुख्यमंत्र्यावर विश्वास आहे, ते जीआर मागे घेतील.पण आताचा मराठा आरक्षणाचा जीआर ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावणारा आहे. ओबीसी आरक्षणासाठी हा विद्रोह आहे. आमच्या हक्काचं ओबीसींचे आरक्षण संपवण्याचा घाट घातल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com