Nana Patole
Nana Patolesarkarnama

Nana Patole : नाना पटोलेंनी सांगितला, पंतप्रधान मोदींच्या भ्रष्टाचाराचा नवीन पॅटर्न; 'नीट', 'एक्झिट पोल आणि शेअर मार्केट'...

Nana Patole Said That NEET Exam New Pattern Of BJP Corruption : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपचे केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात भ्रष्टाचाराचा नवीन पॅटर्न सेट केल्याचा आरोप केला. 'नीट', 'नोटबंदी', 'एक्झिट पोल आणि शेअर मार्केट' हा भ्रष्टाचाराचा पॅटर्न असल्याचे सांगितले.
Published on

Nana Patole Vs BJP : 'नीट' परीक्षेची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी करत 'नीट', 'नोटबंदी', 'एक्झिट पोल आणि शेअर मार्केट'मधील घोटाळा हा भ्रष्टाचाराचे नवीन पॅटर्न भाजपच्या केंद्र सरकारने सेट केले आहे, असा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.

'एक्झिट पोल आणि शेअर मार्केट घोटाळ्या'मुळे तेलुगु देसम पक्षाचे प्रमुख चंद्रबाबू नायडू यांच्या पत्नी नारा भुवनेश्वरी यांच्या संपत्तीमध्ये 535 कोटी तर, त्यांचा मुलगा नारा लोकेश याने संपत्तीमध्ये 237 कोटी कमवले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचाराचा हा नवीन पॅटर्न सेट केला असल्याचेही नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत म्हटले.

नाना पटोले (Nana Patole) यांनी पत्रकार परिषदेत आताच्या 'नीट' परीक्षेला आमचा विरोध असल्याचे सांगितले. "या परीक्षेत गोर-गरिब मुलांना स्थान नाही. जुन्यापद्धतीनेच परीक्षा घेऊन बारावीनंतर विद्यार्थ्यांना डाॅक्टरकीच्या अभ्यासक्रमाला प्रवेश दिला जावा. आमचे सरकार आल्यावर आम्ही हा पॅटर्न बदलणार आहोत. गोर-गरिबांच्या मुला-मुलींना उच्च शिक्षण मिळू नये म्हणून ही 'नीट' परीक्षा लादली गेली आहे.

'नीट'च्या अभ्यासक्रमासाठी काही लाखो रुपये खर्च करतात. परंतु गोर-गरिब मुलांचे आईवडिल करू शकत नाही. 'नीट'च्या परीक्षा रद्द कराव्यात, अशी आमची मागणी आहे. केंद्र सरकारने जाणिवपूर्वक 'नीट' व्यवस्था केली आहे. यातून डाॅक्टरकीच्या शिक्षणापासून गरिबांच्या लेकरांना दूर ठेवले जात आहे. या परीक्षेची सीबीआय चौकशी व्हावी, अशी आमची मागणी आहे", असेही नाना पटोले यांनी म्हटले.

भाजप सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी देशात भ्रष्टाचाराचा नवीन पॅटर्न सेट केला आहे. 'नीट', 'नोटबंदी', 'एक्झिट पोल आणि शेअर मार्केट'मधील घोटाळा याचे उत्तम उदाहरणे आहेत. शेअर मार्केट घोटाळ्याचे उदाहरण सांगताना नाना पटोले यांनी तेलुगु देसम पक्षाचे प्रमुख चंद्रबाबू नायडू यांच्या पत्नी नारा भुवनेश्वरी यांच्या संपत्तीमध्ये 535 कोटी तर, त्यांचा मुलगा नारा लोकेश याने संपत्तीमध्ये 237 कोटी कमवले, याकडे बोट करत चंद्रबाबू नायडू यांना देखील डिवचले.

Nana Patole
MVA VS Mahayuti News : ठाकरेंचे कौतुक करणाऱ्या चंद्रकांतदादांना कोणी फटकारले

भाजपला धर्म आणि जात सत्तेपुढे काहीच वाट नाही. सत्तेसाठी ते काहीही करू शकतात, असा घाणाघात करत बिहारचे माजी मुख्यमंत्री यांनी प्रभू श्रीराम यांना काल्पनिक मानले होते. त्यांना आता कॅबिनेट मंत्रीपद दिले आहे, असे सांगून नाना पटोले यांनी भाजपचा खरा चेहरा समोर आल्याचे म्हटले. जिथे भाजप हरला आहे तिथे, ते रडत आहेत, असा देखील टोला नाना पटोले यांनी लगावला.

राज्यातील असंविधानिक सरकार असल्याचा हल्लाबोल देखील नाना पटोले यांनी केला. हे सरकारविरोधात राज्यपाल यांची भेट घेणार आहे. राज्यात पिण्याचे पाणी मिळत नाही, अशी स्थिती आहे. महाराष्ट्राची वाताहात असंविधानिक भाजप सरकारने केली आहे. भ्रष्टाचार, शेतकऱ्यांची आत्महत्या, बेरोजगारी वाढली आहे. त्यामुळे या असंविधानिक सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नसल्याचेही नाना पटोले यांनी म्हटले.

Nana Patole
NDA Cabinet : मोदींच्या कॅबिनेटमध्ये मुलगा, सून, जावई..! मंत्रिमंडळ नव्हे ‘परिवार मंडळ’…

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com