Bjp News : उद्धव ठाकरेंच्या सभेनंतर भाजपकडून मैदानाची गोमूत्र शिंपडून शुद्धी...

Shivsena : बाळासाहेब ठाकरे यांनी अनेक विराट सभा घेत याच मैदानातून काँग्रेस आणि राष्ट्रवादीला गाडून टाकण्याचे आवाहन केले होते.
Bjp News, Chhatrapati Sambhajinagar
Bjp News, Chhatrapati SambhajinagarSarkarnama

Chhatrapati Sambhajinagar : राज्यातील पहिली महाविकास आघाडीची संयुक्त सभा मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर काल पार पडली. उद्धव ठाकरे (Uddhav Thackray) यांचे भाषण ऐकण्यासाठी मराठवाड्यातील कार्यकर्ते आल्यामुळे मैदान पुर्णपणे भरले होते. ठाकरेंनी भाजपवर या सभेतून जोरदार टीका केली. मोदी-शहा यांच्यासह शिंदे व त्यांच्या मंत्र्यांवर देखील ठाकरेंनी हल्ला चढवला. मात्र दुसऱ्या दिवशी भाजपने या मैदानावर जात गोमुत्र शिंपडून ते शुद्ध केले.

Bjp News, Chhatrapati Sambhajinagar
Ncp Leadaer Join BRS News : राष्ट्रवादीच्या माजी आमदारानंतर पक्षाचा प्रदेश उपाध्यक्ष बीआरएसच्या गळाला..

महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) सभेमुळे मैदान अपिवत्र झाले होते, म्हणून आम्ही ते शुद्ध करून घेतले, असा दावा (Bjp) भाजपने केला आहे. महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा आणि त्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. या सभेवर विरोधक आणि सत्ताधारी अशा दोन्ही बाजूंनी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. असे असतांना भाजपने आज मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर जाऊन गोमुत्र शिंपडत ते शुद्ध केल्याचा दावा केला आहे.

ज्या मैदानावर हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी विराट सभा घेतल्या व प्रत्येक सभेतून काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाला गाडण्याचे आवाहन केले. पण काल झालेल्या सभेत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला त्याच दोन पक्षाच्या कुबड्या घेऊन सभा घ्यावी लागली ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. ज्या ऐतिहासिक मैदानावर बाळासाहेब ठाकरे यांनी अनेक विराट सभा घेत पारंपारिक विरोधक असणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीला गाडून टाकण्याचे आवाहन केले, हिंदुत्वाचा हुंकार दिला.

ते मराठवाडा सांस्कृतिक मंडळाचे मैदान कालच्या सभेने अपवित्र झाले. माझ्या शिवसेनेची काॅंग्रेस व्हायला लागली असे वाटले तर मी माझी दुकान बंद करेल, असा स्वाभिमानी बाणा ठाकरे यांनी दाखवला होता. परंतु तो स्वाभीमानच त्यांचे पुत्र उद्धव ठाकरे यांनी काॅंग्रेस-राष्ट्रवादीकडे गहाण ठेवला. याचा निषेध व मैदान अपवित्र झाले म्हणून भाजपने शहर जिल्हा अध्यक्ष शिरीष बोराळकर यांच्या नेतृत्वाखाली गोमूत्र शिंपडून त्याची शुद्धी केल्याचे सांगितले.

यावेळी सुहास दाशरथे, भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य हर्षवर्धन कराड, ॲड.अमित देशपांडे, संजय फत्तेलष्कर,अमोल झळके, पवन सोनवणे, महेश मल्लेकर, अभय मगरे, सागर विसपुते, सचिन गुगले, ऋषी काथार यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com