Ambadas Danve On Vijaykumar Gavit : गावितांची जीभ घसरली, दानवे म्हणाले वाचळवीरांच्या पंगतीत आणखी एक नाव..

BJP Political News : महापुरुषांची बदनामी करण्यात कसर न सोडणाऱ्या भाजप नेत्यांना अभय मिळाले म्हणूनच महिलांवरही यांची जीभ घसरू लागली.
Ambadas Danve On Vijaykumar Gavit News
Ambadas Danve On Vijaykumar Gavit NewsSarkarnama
Published on
Updated on

Shivsena UBT News : शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्री नेहमी कुठल्या न कुठल्या कारणांमुळे चर्चेत असतात. पण ही चर्चा चांगल्या कारणामुळे असेल तर समजू शकतो पण महापुरुषांचा अवमान, महिलांबद्दल वादग्रस्त विधाने या कारणांमुळे देखील सरकारमधील मंत्री अडचणीत येतांना दिसत आहेत. (Ambadas Danve On Vijaykumar Gavit News) मासे खाण्याचे फायदे सांगतांना राज्याचे आदिवासी खात्याचे मंत्री विजयकुमार गावित थेट चित्रपट अभिनेत्री ऐश्वर्या रायवरच घसरले आणि वादग्रस्त विधान करून बसले.

Ambadas Danve On Vijaykumar Gavit News
Vijaykumar Gavit on Aishwarya Rai: ऐश्वर्या राय मासे खायची म्हणून तिचे डोळे सुंदर झाले; गावितांचे वादग्रस्त विधान

यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ट्विट करत संताप व्यक्त केला. (Shivsena) तसेच वाचाळवीरांच्या यादीत आता विजयकुमार गावितांचे (Vijaykumar Gavit) नावही समाविष्ट झाल्याचा टोला लगावला. वाचाळवीरांच्या पंगतीत अजून एक नाव आता मंत्री विजयकुमार गावित यांचे लागले आहे. महापुरुषांची बदनामी करण्यात कोणतीही कसर न सोडणाऱ्या भाजप नेत्यांना अभय मिळाले म्हणूनच आता महिलांवरही यांची जीभ घसरू लागली आहे.

भक्त आणि उठसुठ शिवसेनेवर तोंडसुख घेणाऱ्या (BJP) भाजपच्या प्रत्येकवेळी महिला अत्याचारावर (सोयीस्कर) भूमिका घेणाऱ्या मंडळींचे कान मात्र असली विधाने ऐकताना बधिर होतात. बरोबर ना बावनकुळेजी, फडणवीसजी असा चिमटाही दानवे यांनी ट्विटच्या माध्यमातून काढला आहे. धुळे जिल्ह्यातील अंतुर्ली येथे आदिवासी मच्छीमार बांधवांच्या कार्यक्रमात बोलतांना गावित यांनी वादग्रस्त विधान केले.

मासे खाण्याचे दोन फायदे आहेत. मासे खाल्ले की बाईमाणूस चिकणी दिसायला लागतात. डोळेपण तरतरीत दिसतात. कुणी बघितलं तर लगेच पटवून घेणार. त्वचाही चांगली दिसू लागते. माश्यात एक प्रकारचं तेल असतं. त्या तेलाचा डोळ्यांवर चांगला परिणाम होतो. माशाच्या तेलामुळे शरीराची त्वचाही चांगली होते असे सांगतांनाच त्यांनी ऐश्वर्या रायचा उल्लेख केला.

"ऐश्वर्या राय बंगळुरूच्या समुद्रकिनारी शहरात राहायची. ती दररोज मासे खायची. त्यामुळे तिचे डोळे सुंदर आहेत. तुम्हीही मासे खाल्ले तर तुमचेही डोळे ऐश्वर्या रायच्या डोळ्यांसारखे सुंदर होतील, त्वचाही सुधारेल, असा सल्ला गावितांनी उपस्थितांना दिला. मात्र हा सल्ला वजा उपदेश त्यांच्या आता अंगलट येण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षाने तर हा मुद्दा हाती घेतला आहेच. आता भाजपचे वरिष्ठ नेते गावितांच्या या विधानाकडे कसे पाहतात? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com