Beed Crime : बीड जिल्हा हादरला! घरात बोलावून डाॅक्टरकडून बेकायदा गर्भलिंग निदान

Police : डमी गर्भवतीला पाठवून छापा, दोघांना पोलिसांकडून अटक
Beed Crime
Beed Crimesarkarnama
Published on
Updated on

Beed : एकेकाळी बेकायदा गर्भलिंग निदान व स्त्री-भ्रूणहत्येच्या प्रकारांमुळे चर्चेत आलेल्या जिल्ह्यात मुलींचा जन्मदर वाढला असतानाच पुन्हा एकदा बेकायदा गर्भलिंग निदान व गर्भपात केला जात असल्याचा प्रकार गुरुवारी (ता. 4) समोर आला. आरोग्य विभाग व पोलिस प्रशासनाने छापा टाकून गेवराईतील संजयनगर भागातील या बेकायदा गर्भलिंग निदान व गर्भपात केंद्राचा भंडाफोड केला.

Beed Crime
Abdul Sattar News : सत्तारांचे हे वागणे बरे नव्हे...!

मनीषा शिवाजी सानप (वय 40, रा. अर्धमसला, ता. गेवराई) व चंद्रकांत पांडुरंग चंदनशिव (वय 45, रा. संतोषनगर, गेवराई) व डॉ. सतीश गवारे (रा. जालना) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. यातील डॉ. गवारे याने पोलिसांशी झटापट करून पळ काढला. या ठिकाणी सोनोग्राफी मशिन, गर्भपाताची औषधे व उपकरणे आढळली आहेत.

मनीषा सानप गेवराईतीलच एका घरात डॉ. सतीश गवारे याला बोलावून महिलांचे बेकायदा गर्भलिंग निदान करत होती. बीड तालुक्यातील सीताबाई ऊर्फ शीतल गाडे या महिलेच्या बेकायदा गर्भलिंग निदानानंतर गर्भपात केला होता. यानंतर या महिलेच्या मृत्यूनंतर हा प्रकार उघड झाला होता. आता पुन्हा मनीषा सानपने गेवराईतील संजयनगर भागातील चंद्रकांत चंदनशिव याच्या घरात हा प्रकार सुरू केला होता. याबाबत आरोग्य विभागाला तक्रार प्राप्त झाल्यानंतर आरोग्य विभाग व पोलिस प्रशासनाने डमी महिलेला पाठवून तिचे गर्भलिंग निदान व गर्भपात करायचा असल्याचे सांगून या बेकायदा गर्भलिंग निदान व गर्भपात केंद्राचा छडा लावला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

याप्रकरणी गेवराई पोलिस ठाण्यात उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, मनीषा सानप ही अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत असतानाच ती जालन्यातील डॉ. सतीश गवारेला बोलावून गेवराईतील आपल्या घरी महिलांचे बेकायदा गर्भलिंग निदान व गर्भपात करीत असे. दीड वर्षापूर्वी तिच्यावर गुन्हा नोंद झाल्यनंतर महिला व बालकल्याण विभागाने तिच्यावर बडतर्फीची कारवाई केली. वर्षभर जेल भोगून परतल्यानंतर पुन्हा तिने हाच धंदा सुरू केला.

Beed Crime
Nanded BJP News : खासदार चिखलीकर 'ॲक्शन मोड'मध्ये; म्हणाले, चव्हाण-खतगावकरांनी लावली नांदेडची वाट

दरम्यान, डमी रुग्ण असलेली महिला पोलिस व एक पोलिस कर्मचारी या बेकायदा केंद्रावर पोचल्यानंतर अगोदरच मनीषा सानप व डॉ. सतीश गवारे एका महिलेची सोनोग्राफी करीत होते. त्याला डमी आलेल्याचा संशय आल्याने डॉ. गवारेने पळ काढला. त्याला अडविण्याचा प्रयत्न केल्याने त्याने पोलिसांशी केलेल्या झटापटीत पी. टी. चव्हाण व प्रतिभा चाटे जखमी झाले. दरम्यान, या ठिकाणी मोबाईल सोनोग्राफी मशिनसह, गोळ्या तसेच सिम्स स्पेक्युलम, युटेराईन क्युरेटर, स्पाँज होर्डिंग्ज, फोर्सेप ही उपकरणेही या ठिकाणी आढळली आहेत.

कारवाईत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक बडे, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक संतोष साबळे, एचटीयूच्या सहायक पोलिस निरीक्षक सुरेखा धस, वैद्यकीय अधीक्षक डॉ. मोहंमद नोमानी, ॲड. नीलेश जोशी, सुनीता शिंदे, डॉ. राजेश शिंदे, डॉ. गोपाळ रांदड, राजू काळे, श्री. माने, गणेश नाईकनवरे, फौजदार जगदीश मोरे, पी. टी. चव्हाण, गणेश हंगे, नारायण कोरडे, सुनील राठोड, चंद्रभागा मुळे, मनीषा राऊत, सतीश बहिरवाळ, विकास नेवडे, हेमा वाघमारे, रेखा गोरे, अनिता खरमाटे, सविता सोनवणे, प्रतिभा चाटे, कौशल्या ढाकणे आदींनी सहभाग घेतला.

(Edited By Roshan More)

Beed Crime
Uddhav Thackeray : '...तेव्हा आम्हाला 'मातोश्री'हून आव्हाडांना सांभाळून घ्या, असे फोन यायचे!'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com