Abdul Sattar News : सत्तारांचे हे वागणे बरे नव्हे...!

Gautami Patil's dance-song program : सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नावाखाली गौतमी पाटीलच्या नाच - गाण्याचा कार्यक्रम
Abdul Sattar
Abdul SattarSarkarnama
Published on
Updated on

Abdul Sattar News : मंत्री अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सिल्लोड महोत्सवात काल जो प्रकार घडला त्याचे समर्थन निश्चितच करता येणार नाही. परंतु वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी आलेल्या आपल्याच मतदारसंघातील नागरिक आणि तरुणांवर पोलिसांना काठ्या चालवण्याचे आदेश देणे, त्यांना जाहीरपणे माईकवरून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करणे हे राज्याच्या मंत्रिपदावर कार्यरत असलेल्या नेत्याला निश्चितच शोभणारे नाही.

राज्याचे अल्पसंख्याक विकास व पणनमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांचा वाढदिवस साजरा करण्याच्या पद्धतीबद्दल अनेक आक्षेप आहेत. एरवी सामाजिक उपक्रम राबवण्याचे ढोल बडवणाऱ्या सत्तार यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नावाखाली गौतमी पाटीलच्या नाच - गाण्याचा कार्यक्रम ठेवणे योग्य नव्हतेच. गौतमी पाटील हीचे राज्यभरात जिथे - जिथे कार्यक्रम झाले, त्या सर्वच ठिकाणी हुल्लडबाजी, दगडफेक झाल्याने पोलिसांकडून लाठीमाराच्या घटना घडलेल्या आहेत.

Abdul Sattar
Fadnavis Vs Khadse : देवेंद्र फडणवीस सर्वात अपयशी गृहमंत्री; खडसेंनी पुन्हा डिवचले...

परंतु या सगळ्याकडे डोळेझाक करत सत्तार यांनी केवळ मतांच्या बेरजेचे राजकारण डोळ्यासमोर ठेवून गौतमी पाटील हिच्या नृत्याचा कार्यक्रम आपल्या वाढदिवसानिमित्त ठेवला. या कार्यक्रमासाठी मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात तरुण आले होते. गौतमी पाटील, तिच्यातील दिलखेचक अदा आधीच वादग्रस्त ठरल्या आहेत.

तरुणांच्या भावनांना हात घालणे, हावभाव या प्रकारामुळे गौतमी पाटीलचे कार्यक्रम अनेक ठिकाणी रद्द करण्यात आले आहेत. सिल्लोड (Sillod) मध्ये काल जो प्रकार घडला तो तरुणांच्या अतिउत्साहीपणातून घडला. गौतमी पाटील हिला जवळून पाहता यावे, यासाठी रेटारेटी आणि स्टेजकडे जाण्याची स्पर्धा लागली. विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी महिलाही मोठ्या संख्येने आल्या होत्या.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी जमवून जर अनुचित प्रकार घडला तर तो टाळण्यासाठी आवश्यक असलेला पोलिस बंदोबस्त या कार्यक्रमाच्या ठिकाणी करण्यात आलेला नव्हता. त्यामुळे आयोजकांचा गलथानपणाही कालच्या गोंधळाला कारणीभूत ठरला. उत्साहाच्या भरात हुल्लडबाजी करणाऱ्या गर्दीला आवरण्यासाठी सत्तार आणि त्यांची पुत्र समीर या दोघांनी जी अर्वाच्च भाषा वापरली ती न शोभणारी होती.

अब्दुल सत्तार यांनी तर कहरच केला. मागे बसलेल्या पोरांना झोडपून काढा, सुजेपर्यंत त्यांना मारा आणि हे सांगताना त्यांच्या तोंडून शिवराळ भाषाही वापरण्यात आली. एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर त्यांनी शिवीगाळ करत आपल्याच असंस्कृतपणाचे प्रदर्शन जाहीरपणे घडवले. आठवडाभराच्या सिल्लोड महोत्सवामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नावाखाली लावण्या आणि गौतमी पाटीलच्या नाच-गाण्याच्या कार्यक्रमामुळे गालबोट लागले.

Abdul Sattar
Chhagan Bhujbal: छगन भुजबळ झाले भावूक; केली 'ही' मोठी घोषणा

उपस्थित गर्दीची हुल्लडबाजी आवरण्यासाठी अब्दुल सत्तार यांनी वापरलेली भाषा, केलेली शिवीगाळ यामुळे या महोत्सवाची रया गेली. त्यामुळे आता उर्वरित पाच दिवसांचे कार्यक्रम आणि सामाजिक उपक्रम याकडे लोकांनी पाठ फिरवली तर काय ? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. अब्दुल सत्तार यांचा सिल्लोड महोत्सव नेहमीच वादातीत राहिलेला आहे.

गेल्या वर्षी कृषिमंत्री असताना कृषी आणि सिल्लोड महोत्सवाची सांगड घालत सत्तार यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले होते. कृषिमंत्रिपद गेल्यानंतर सिल्लोड महोत्सवाचे हे आयोजन आता सत्तार यांच्या शिवीगाळ प्रकरणामुळे वादात सापडले आहे.

(Edited by Amol Sutar)

Abdul Sattar
Shiv Sena News : वादग्रस्त विधान जितेंद्र आव्हाडांचे, टीका ठाकरेंवर... कारण काय?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com