Anand Paranjape News : आव्हाडांवर गुन्हा दाखल करा, नाहीतर पोलिस ठाण्यावर रामाची आरती; परांजपेंचा इशारा...

Anand Paranjape On Jitendra Awhad : एकेकाळचे सहकारी उभे ठाकले विरोधात...
Anand Paranjape News : Jitendra Awhad
Anand Paranjape News : Jitendra AwhadSarkarnama
Published on
Updated on

Thane News : 'माझे सहकारी कुठलेही आंदोलन करायला आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावर गेले नव्हते. तर प्रभू रामाचा फोटो घेऊन ते तेथे महाआरती करण्यासाठी गेले होते. मात्र पोलिसांनी त्यांना महाआरती करण्यापासून रोखले आणि वर्तकनगर पोलीस ठाण्यात नेले. कायम हिंदू देवतांचा अपमान करायचा आणि हिंदू धर्माबद्दल अभद्र बोलायचं ही डॉ. जितेंद्र आव्हाड यांची संस्कृती आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ठाण्याचे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी आव्हांडावर टीकेची झोड उठवली. (Latest Marathi News)

Anand Paranjape News : Jitendra Awhad
NCP News: रोहितदादांची अनुपस्थिती; जयंतराव म्हणतात, 'माझा कुणाशीही वाद नाही... मी गरीब माणूस'

भगवान रामाबद्दल केलेल्या वक्तव्याने हिंदू धर्माच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे आव्हाड यांच्यावर पुढील २४ तासात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आनंद परांजपे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली. तसेच, गुन्हा दाखल झाला नाहीतर, वर्तकनगर पोलीस ठाण्यावरच मोठा मोर्चा काढूच, शिवाय महाआरती करू इशारा त्यांनी दिला आहे. त्यामुळे आता ठाण्यात कायदा-सुव्यवस्था निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत.

Anand Paranjape News : Jitendra Awhad
CAA Act News : राम मंदिरानंतर लोकसभेआधी 'CAA' कायदा लागू होणार? मोदी सरकारची रणनीती...

"धर्मनिरपेक्षता म्हणजे हिंदू धर्माचा अपमान नाही, धर्मनिरपेक्षता म्हणजे मी हिंदू धर्माचा ही तेवढाच सन्मान करेल, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बुद्ध इतर धर्माचा ही मी तितकाच सन्मान करेल असा आहे. शिर्डीत श्री राम यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याने हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे पुढील 24 तास आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करावा. अन्यथा वर्तकनगर पोलीस ठाण्यावर मोठा मोर्चा काढणार असल्याचे, परांजपे यांनी सांगितले. तसेच, पुढची महाआरती आम्ही पोलिस ठाण्यावर करू, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com