Beed Assembly Election : योगेश क्षीरसागरांच्या उमेदवारीचा मध्यरात्रीच धमाका; पक्षांतर्गत विरोधक घायाळ

Yogesh Kshirsagar : डॉ. क्षीरसागरांना विरोध करणारे आणि उमेदवारीच्या स्पर्धेतील सर्वच या धमाक्याने घायाळ झाले आहेत.
Beed Politics Yogesh Kshirsagar
Beed Politics Yogesh KshirsagarSarkarnama
Published on
Updated on

Beed Political News : जिल्ह्यातील महायुतीमधील शिवसेनेची एकमेव जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदरात पाडून घेण्यात अजित पवार व धनंजय मुंडेंना यांना यश आले. मध्यरात्री डॉ. योगेश क्षीरसागर यांच्या उमेदवारीची घोषणा झाली. डॉ. क्षीरसागरांना विरोध करणारे आणि उमेदवारीच्या स्पर्धेतील सर्वच या धमाक्याने घायाळ झाले आहेत.

पूर्वीच्या महायुतीमध्ये बीडची जागा शिवसेनेला तर उर्वरित पाच विधानसभा मतदारसंघ भाजपला असत. मागच्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेसचा महायुतीत समावेश झाल्यानंतर समी‍करणे बदलली. ज्यांचा आमदार त्यांचा उमेदवार असे समीकरण अजित पवार व धनंजय मुंडे यांनी मांडून बीडच्या जागेवर दावा सांगीतला.

विशेष म्हणजे बीडचे आमदार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (संदीप क्षीरसागर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात आहे) नसतानाही ही जागा शिंदेंच्या शिवसेनेकडून पदरात पाडून घेतली आहे.

Beed Politics Yogesh Kshirsagar
Aurangabad East Assembly: पूर्वमध्ये एमआयएमची खेळी वंचितने उलटवली का ?

शिवसेना जिल्हा प्रमुख अनिल जगताप मागच्या दोन वर्षांपासून तयारी करत आहेत. तर, त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्जही दाखल केला आहे. शेवटच्या टप्प्यात शिवसेनेकडून (Shivsena) युवा सेनेचे बाजीराव चव्हाण देखील स्पर्धेत आले होते.

दरम्यान, मागच्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत सहभागी झाल्यानंतर डॉ. योगेश क्षीरसागर यांनी काका माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर (Jaydatta Kshirsagar) यांची साथ सोडून धनंजय मुंडे यांचे नेतृत्व स्विकारले. शहरातील तीन्ही क्षीरसागरांचे अनेक समर्थक धनंजय मुंडेंच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सहभागी झाले. पंरतु, बहुतेकांनी डॉ. योगेश क्षीरसागर यांचे नेतृत्व नाकारले. त्यामुळे मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर गटबाजीही झाली.

Beed Politics Yogesh Kshirsagar
Beed Politics : भाजपच्या जगतापांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची उमेदवारी; माजी आमदारांचा हल्लाबोल

मागील वर्षभरापासून डॉ. योगेश क्षीरसागर व त्यांच्या पत्नी डॉ. सारिका क्षीरसागर मतदारसंघात संपर्क दौरे करत आहेत. तर, तीन महिन्यांपासून त्यांच्यासह तय्यब शेख, फारुक पटेल हे देखील मुंडेंकडून ग्रीन सिग्नल असल्याने तयारी करत होते. मात्र, ऐनवेळी उमेदवारीची माळ डॉ. योगेश क्षीरसागर यांच्याच गळ्यात पडली. विशेष म्हणजे मध्यरात्री दोन वाजता डॉ. क्षीरसागरांच्या नावाच्याा घोषणेचा धमका झाला आणि पक्षांतर्गत विरोधकांसह शिवसेनेतील इच्छुकही घायाळ झाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com