UDISE Fraud Probe : बोगस संचमान्यतेचा बीडमध्ये महाघोटाळा ; चंपावती विद्यालयात आढळले चक्क उत्तराखंडचे विद्यार्थी!

Beed alleged fake admissions: बीडच्या चंपावती विद्यालयात उत्तराखंडमधील तीन विद्यार्थ्यांचे कथित बनावट प्रवेश आढळल्याचा शिक्षण विभागाच्या चौकशीत खुलासा झाला. गोपनीय अहवाल शिक्षण आयुक्तांकडे पाठवण्यात आला असून पुढील कारवाईकडे लक्ष लागले आहे.
Beed alleged fake admissions
Beed alleged fake admissionsSarkarnama
Published on: 
Updated on: 

नितीन चव्हाण

Marathwada News : बीड जिल्ह्यातील खाजगी शिक्षण संस्थांमध्ये पटसंख्या फुगवून बोगस संचमान्यता पदरात पाडून घेण्यासाठी आणि शिक्षकांची पदे वाचवण्यासाठी विद्यार्थी खरेदी-विक्रीचा धक्कादायक महाघोटाळा उघडकीस आला आहे. बीड येथील चंपावती विद्यालयात प्राथमिक शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी शुक्रवारी प्रत्येक्ष भेट देऊन केलेल्या चौकशीत उत्तराखंडमधील यू-डायसवर नोंद असलेल्या तीन विद्यार्थ्यांचे बनावट प्रवेश दाखवल्याचे निष्पन्न झाले आहे.

या गंभीर गैरप्रकाराचा गोपनीय अहवाल शिक्षणाधिकाऱ्यांनी थेट पुणे शिक्षण आयुक्तांकडे सादर केल्याने जिल्ह्यातील बोगस संस्थाचालक आणि दलालांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. संचमान्यतेत शिक्षकांची पदे अतिरिक्त ठरू नयेत आणि नवीन बोगस तुकड्या मंजूर करून घेता याव्यात यासाठी बीड जिल्ह्यात संस्थाचालक, मुख्याध्यापक आणि एजंटांचे मोठे रॅकेट सक्रिय आहे.

चंपावती विद्यालयातील या प्रकारानंतर शिक्षणाधिकाऱ्यांनी तात्काळ सखोल तपासणी करून लेखी अहवाल वरिष्ठ पातळीवर पाठवला आहे. या चौकशीमुळे बीडच्या शिक्षण वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. ऑगस्ट ते सप्टेंबर या संचमान्यतेच्या काळात इतर राज्यातील किंवा इंग्रजी शाळांतील विद्यार्थ्यांचे यू-डायस आयडी वापरून कागदोपत्री प्रवेश दाखवणे, संचमान्यता मंजूर होऊन पदे मंजूर होताच या विद्यार्थ्यांना पुन्हा त्यांच्या मूळ शाळांच्या यू-डायस आयडीवर वर्ग करणे असे प्रकार सर्रास सुरू होते.

Beed alleged fake admissions
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेचा मुक्काम तुरुंगातच; न्यायालयाने जामीन नाकारला!

चंपावती विद्यालयातील या प्रकारानंतर शिक्षणाधिकाऱ्यांनी तात्काळ सखोल तपासणी करून लेखी अहवाल वरिष्ठ पातळीवर पाठवला आहे. या चौकशीमुळे बीडच्या शिक्षण वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या महाघोटाळ्याविरोधात भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे राज्य अध्यक्ष सादिक इनामदार यांनी मुख्यमंत्री, शालेय शिक्षण प्रधान सचिव आणि शिक्षण आयुक्त (पुणे) यांच्याकडे पाठपुरावा केला आहे.

बीड जिल्ह्यात यू-डायसचा गैरवापर करून शासनाची थेट फसवणूक केली जात आहे. २०२२ ते २०२६ दरम्यान संचमान्यतेच्या काळात अचानक पटसंख्या वाढवणाऱ्या शाळांची एसआयटी चौकशी व्हावी आणि या रॅकेटमधील संस्थाचालक, मुख्याध्यापक व दलालांवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी थेट मागणी सादिक इनामदार यांनी केली आहे.

Beed alleged fake admissions
Ambadas Danve : जेम्स बाँड, टॉमक्रूझने लाजून कोपऱ्यात उभं राहावं, असा एक्शन ड्रामा; अभिजीत दिपकेला विमानातून ताब्यात घेताच ठाकरेंच्या शिवसेनेची मोदी सरकारवर टीका!

कायदेशीर कारवाई होणार..

शिक्षण आयुक्तांच्या आदेशानुसार शुक्रवारी (ता. 9) आम्ही शाळेत प्रत्यक्ष जाऊन सखोल चौकशी केली. या तपासात अनेक गंभीर अनियमितता आणि त्रुटी आढळून आल्या आहेत. यासंदर्भातील सविस्तर गोपनीय अहवाल आयुक्त साहेबांकडे सादर करण्यात आला आहे. आता वरिष्ठ पातळीवरून जशा सूचना किंवा आदेश प्राप्त होतील, त्यानुसार संबंधित शाळा व दोषींवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असे प्राथमिक शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी सांगीतले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com