Beed Collector News : दुष्काळात तहसीलदार सुट्टीवर, बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढला; प्रशासन हादरले...

Beed News, Marathwada drought, Kej Tehsildar, Bharat Gangawane, Vivek Johnson : आमदार नमिता मुंदडा यांच्या प्रमुख उपस्थितीत दुष्काळ निवारणाचा महत्त्वाचा आढावा बैठकीत घेण्यात आला होता. ​ या बैठकीत तहसीलदार अनुपस्थित होते.
Beed Collector Vivek Johnson
Beed Collector Vivek JohnsonSarkarnama
Published on: 
Updated on: 

Marathwada Drought update : मराठवाड्यात दुष्काळ आहे, मुख्यमंत्र्यांसह सत्ताधारी व विरोधी पक्षाचे लोकप्रतिनिधी दुष्काळ पाहणी दौऱ्यावर असताना केजचे तहसीलदार सुटीवर गेले. परवानगीशिवाय कोणीही मुख्यालय सोडू नये, असे आदेश असताना जिल्हाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीला दांडी मारणे तहसीलदारांना चांगलेच महागात पडले.

जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी केजचे तहसीलदार भारत गंगावणे यांचा पदभार काढत त्यांना दणका दिला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या या थेट कारवाईने प्रशासनात एकच खलबळ उडाली आहे. बीड जिल्ह्यात भीषण दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झालेली असताना, प्रशासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर काम करणे अपेक्षित आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी अतिरिक्त कार्यभार आता नायब तहसीलदार अशोक भंडारे यांच्याकडे सोपविला आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी लेखी आदेश काढले आहेत. केज तालुक्यातील गंभीर दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी जॉन्सन यांनी स्वतः शनिवारी (ता.२६) केज तहसील कार्यालयास भेट दिली होती.

Beed Collector Vivek Johnson
Fadnavis government news : दुष्काळात फडणवीस सरकारने माजी अधिकाऱ्यांसाठी तिजोरी उघडली; रश्मी शुक्ला, गुप्तांसह चौघांना 4 आलिशान कार

आमदार नमिता मुंदडा यांच्या प्रमुख उपस्थितीत दुष्काळ निवारणाचा महत्त्वाचा आढावा बैठकीत घेण्यात आला होता. ​दुष्काळाच्या काळात तालुकास्तरावर तहसीलदार हेच संपूर्ण उपाययोजनांचे मुख्य समन्वयक आणि जबाबदार प्रमुख अधिकारी असतात. परंतु, अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाच्या बैठकीस पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय न सोडण्याचे आदेश असतानाही तहसीलदार गंगावणे या बैठकीला गैरहजर राहिले.

गंगावणे यांच्या अनुपस्थितीमुळे दुष्काळी कामांच्या आढाव्यात थेट प्रशासकीय अडथळा निर्माण झाला. प्रशासकीय कामकाजात कोणतीही दिरंगाई किंवा अडथळा येऊ नये आणि दुष्काळ निवारणाच्या उपाययोजना गतीने राबवल्या जाव्यात, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापना शाखेने तातडीने आदेश जारी केले आहेत. आदेशानुसार, भारत गंगावणे यांच्याकडील केज तहसीलदार पदाचा अतिरिक्त पदभार नायब तहसीलदार (महसूल-२) अशोक भंडारे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

Beed Collector Vivek Johnson
Satej Patil news : गोकुळच्या निकालादिवशी बिनआवाजाचा बाँब फुटणार; सतेज पाटलांकडून मोठ्या बदलाचे संकेत

हलगर्जीपणा खपवून घेणार नाही...

सध्या जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती असून संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेने अत्यंत संवेदनशीलतेने आणि सतर्क राहून काम करणे गरजेचे आहे. सर्व तहसीलदारांना व जबाबदार अधिकाऱ्यांना पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय न सोडण्याचे आणि दुष्काळ आढावा बैठकांना अनिवार्यपणे उपस्थित राहण्याचे कडक निर्देश देण्यात आले होते.

दुष्काळ निवारणाच्या कामात आणि प्रशासकीय समन्वयात कोणतीही दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही. त्यामुळे प्रशासकीय कामकाजात सातत्य आणि गती राखण्यासाठी त्यांच्याकडील पदभार काढून घेण्यात आला असून नायब तहसीलदारांकडे सुपूर्द करण्यात आला आहे. कर्तव्यात कसूर करणाऱ्या कोणत्याही अधिकाऱ्यावर अशीच कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिला.

कारवाई चुकीची, पूर्वकल्पना दिली होती...

माझ्यावर झालेली कारवाई पूर्णपणे चुकीच्या माहितीच्या आधारे आणि घाईगडबडीत करण्यात आली आहे. मी कोणतीही पूर्वपरवानगी न घेता गैरहजर राहिलो नव्हतो. माझ्या घरी महत्त्वाचा कौटुंबिक कार्यक्रम असल्याने तिथे उपस्थित राहणे अत्यंत गरजेचे होते. यासाठी मी रीतसर सुट्टी घेण्यापूर्वी जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकारी यांना रीतसर लेखी पत्रव्यवहार करून पूर्वकल्पना दिली होती, अशी माहिती गंगावणे यांनी दिली.

​वरिष्ठांच्या कानावर घालून आणि आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करूनच मी सुट्टीवर गेलो होतो. एवढेच नाही तर जिल्हाधिकाऱ्यांच्या दौऱ्यादरम्यानची सर्व वस्तुस्थिती व माहिती स्पष्टपणे कळवण्यात आली होती. सर्व प्रशासकीय शिस्त पाळली असतानाही अशा पद्धतीने अन्यायकारक कारवाई करणे पूर्णपणे चुकीचे आहे, असा खुलासा तहसीलदार गंगावणे यांनी कारवाईवर केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com