Beed Crime News : संतोष देशमुख हत्येचा धसका! बीडमध्ये पोलिसांचा भल्याभल्यांना दणका, 'या' कारवाईने गुन्हेगारांना भरली धडकी...

Beed Crime News After the Santosh Deshmukh Death Case : संतोष देशमुख हत्याकांडानंतर बीडमध्ये वर्षभरात ३५० हून अधिक शस्त्र परवाने रद्द. गुन्हेगारीवर आता लगाम बसणार का?
Beed Crime
Beed CrimeSarkarnama
Published on
Updated on

Home-Revenue Department Aciton : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण व हत्येच्या घटनेनंतर जिल्ह्यातील वाळू माफियागीरी, शस्त्र परवाने आदी कायदा आणि सुव्यस्थेचे मुद्दे समोर आले. त्यामुळे गृह आणि महसूल विभागाने शस्त्र परवाने रद्द करण्याची मोहिम हाती घेत वर्षभरात तब्बल 365 रिव्हॉल्वरचे (अग्नीशस्त्र) परवाने रद्द केले आहेत. या वर्षभरात नव्याने केवळ चार शस्त्रपरवाने वाटप करण्यात आले.

मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये संतोष देशमुख यांच्या खुनानंतर जिल्ह्यातील इतरही कायदा आणि सुव्यवस्थेचे मुद्दे चर्चेत आले. यात रिव्हॉल्वरच्या परवान्याचा मुद्दाही समोर आला. जिल्ह्यात जानेवारी महिन्यात तब्बल 1281 शस्त्र परवाने होते. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सुत्रधार वाल्मीक कराडकडेही शस्त्र परवाना होता. दरम्यान, काही परवानाधारक हवेत फैरी करताना, हातात पिस्टल घेऊन शायनिंग असे फोटोही समोर आले. यावरुन वर्षाच्या सुरुवातीला गुन्हेही नोंद झाले.

याच दरम्यान, 49 परवानाधारकांनी स्वत:हून परवाने समर्पित केले. महसूल विभागाने गृह विभागाकडून अहवाल घेतल्यानंतर पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी काही परवान्यांचे नुतणीकरण करण्यास हरकत घेतली. तसेच गुन्हा नोंद असलेल्यांची यादीही महसूल विभागाला सोपविण्यात आली. यानंतर तत्कालिन जिल्हाधिकारी अविनाश पाठक व जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी 365 परवाने रद्द केले आहेत. सध्या जिल्ह्यात 916 लोकांकडे रिव्हॉल्वर परवाने आहेत.

Beed Crime
Local Body Election News : नगरपालिका निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढला; लक्ष्मी दर्शन, परिवर्तनाची नांदी की मग महायुतीच्या विकास कामांवर शिक्कामोर्तब?

गुन्हे दाखर तरी परवाने

दरम्यान, मागच्या काळात जिल्ह्यात गंभीर गुन्हे नोंद असलेल्यांकडेही शस्त्र परवाने होते. महसूल विभागाने गुन्हे नोंद असलेल्यांचा अहवाल मागीतल्यानंतर गृह विभागाने यातील 96 लोकांवर गुन्हे नोंद असल्याचा अहवाल दिला. त्यामुळे त्यांचेही परवाने रद्द करण्यात आले. तर, परवाने असलेल्यांमध्ये 100 व्यक्ती मयत आणि 70 वयोवृद्ध होते. त्यांचेही परवाने रद्द करण्यात आले आहेत.

Beed Crime
Indigo Airlines : 3 गोष्टींसाठी झाली होती 'इंडिगोची' सुरुवात : कोण आहेत मालक?

नव्याने फक्त चार परवाने

या वर्षभरात नव्याने केवळ चार रिव्हॉल्वर परवाने देण्यात आले आहेत. यात तीन परवाने बँकांचे आहेत. रोकड इकडून तीकडे वाहतूक करण्यासाठी सुरक्षीतता म्हणून हे परवाने देण्यात आले. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी अग्नीशस्त्र परवान्यांचा आढावा घेतल्यानंतर आवश्‍यकता नसलेले, गंभीर गुन्हे नोंद असलेले तसेच वृद्ध व मयत व्यक्तींचे परवाने रद्द केले असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com