Beed Election News : बीडच्या उपनगराध्यक्षपदासाठी तगडी फिल्डिंग; क्षीरसागर बंधू एक होणार की पंडित बाजी मारणार?

इकडे राष्ट्रवादीचा कॉन्फिडन्स असला तरी दुसरीकडे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगरसेवकांची बीड शहर विकास आघाडी स्थापन झाली आहे.
Sandeep Kshirsagar Sarika Kshirsagar Sandeep Kshirsagar Vijaysinh Pandit
Sandeep Kshirsagar Sarika Kshirsagar Sandeep Kshirsagar Vijaysinh Pandit Sarkarnama
Published on
Updated on

Beed News : बीड नगर पालिकेची निवडणुक अटीतटीची झाली. राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप व राष्ट्रवादी अशा तिरंगी सामन्यात राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली. आता उपनगराध्यक्षपदासह विषय समित्यांच्या निवडीसाठी नेत्यांचे राजकीय डावपेच सुरु असून त्यांचे समर्थक आडाखे बांधत आहेत. आता यात बाजी कोण मारणार? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. त्रिशंकु संख्याबळ असल्याने क्षीरसागर बंधू एकत्र येणार की पंडित बाजी मारणार? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

नगरपालिका निवडणुकीने बीड शहराच्या आणि विधानसभा मतदारसंघाच्या राजकारणाची गणिते कमालीची बदलली आहेत. मागच्यावेळीही तिरंगी लढतीमध्ये दोन क्षीरसागर आमने - सामने होते. परंतु, निकालानंतर नगराध्यक्षपद एकाकडे तर उपनगराध्यक्ष एकाकडे अशी सत्तेची विभागणी झाली. या निवडणुकीत डॉ. योगेश क्षीरसागर यांनी भाजपात प्रवेश केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा ऐनवेळी आमदार विजयसिंह पंडित (VijaySinha Pandit) यांच्यावर आली.

निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप असा अटीतटीचा सामना झाला आणि त्यात राष्ट्रवादीची सरशी झाली. पण, नगरसेवकांच्या संख्येत राष्ट्रवादीच्या 19 नगरसेवकांच्या खालोखाल भाजपचेही 15 नगरसेवक विजयी झाले. तर, आमदार संदीप क्षीरसागर (Sandeep Kshirsagar) यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचेही 12 सदस्य विजयी झाले.

'गेवराईचे पार्सल', 'तुमच्या काकाचा पक्ष' या डॉ. क्षीरसागरांच्या टोलेबाजीला सत्तेतून टोलवत उत्तर देण्यासाठी विजयसिंह पंडित यांनी शिवसेनेचे अनिल जगताप, राजेश्‍वर चव्हाण, संजय दौंड, बळीराम गवते या साथीदारांसोबत प्रयत्न सुरु केले आहेत.

Sandeep Kshirsagar Sarika Kshirsagar Sandeep Kshirsagar Vijaysinh Pandit
Shivsena Vs BJP : भाजपच्या खेळीने अख्ख्या शिवसेनेचा गेम; जिल्हाप्रमुखासह सर्व इच्छुक पदाधिकाऱ्यांना एका फटक्यात घरी बसवले

पक्षाच्या 19 सदस्यांसोबत शिवसेना, काँग्रेस व एमआयएमलाही गळाला लावत त्यांनी शिव - शाहू - फुले - आंबेडकर बीड शहर विकास आघाडीची स्थापना केली आहे. या आघाडीच्या उपनगराध्यक्ष, विषय समित्यांचे अंकणित जुळल्याचा दावाही या पक्षाच्या नेत्यांकडून केला जात आहे.

क्षीरसागरांबाबत तीन शक्यता

इकडे राष्ट्रवादीचा असा कॉन्फिडन्स असला तरी दुसरीकडे आज संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगरसेवकांची बीड शहर विकास आघाडी स्थापन झाली आहे. यामध्ये 13 सदस्यांचा समावेश आहे. तर, डॉ. योगेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे 15 नगरसेवक आहेत. या दोघांचा एकत्रित आकडा उपनगराध्यक्षपद व विषय समित्यांमध्ये विजयाचे गणित जुळविणारा आहे.

Sandeep Kshirsagar Sarika Kshirsagar Sandeep Kshirsagar Vijaysinh Pandit
Russia India Decision: पुतीन यांच्या घरावरील हल्ल्यानंतर काही तासांतच रशियाची भारतासाठी मोठी घोषणा; एकाचवेळी पाकिस्तान अन् अमेरिका हादरणार

दरम्यान, निकालाच्या दिवशीच भाजपच्या गटनेत्या डॉ. सारिका क्षीरसागर यांनी 'कोण म्हणतय क्षीरसागरमुक्त', संदीप क्षीरसागर आपले 'दीर'अशी प्रतिक्रिया दिली होती. याचा आधार घेत दोन्ही क्षीरसागरांनी एकत्र येतील व डॉ. सारिका क्षीरसागर उपनगराध्यक्ष होतील, अशी एक अटकळ बांधली जात आहे.

तर, राज्याच्या युतीच्या फॉर्म्युल्यानुसार भाजपला सत्तेत सोबत घ्यावे, यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून थेट अजित पवारांपर्यंतही प्रयत्न सुरु आहेत. तिसरी सर्वात मोठी शक्यता म्हणजे, संदीप क्षीरसागर यांच्या आघाडीला भाजपने बाहेरुन पाठींबा द्यायचा आणि पंडितांचा डाव उधळायचा प्रयोग देखील होऊ शकतो, अशीही चर्चा आहे. नेमके घडते काय? हे लवकरच कळणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com