Suresh Dhas : धनंजय मुंडेंमुळे राष्ट्रवादी 'क्लिन बोल्ड', सगळे स्टंप...; सुरेश धसांनी अजितदादांना डिवचलं

BJP Suresh Dhas Dhananjay Munde Ajit Pawar NCP party Beed : बीड धनंजय मुंडे यांच्यामुळे अजित पवार यांच्या एनसीपी पार्टीची जनतेत काय स्थिती आहे यावर भाजप आमदार सुरेश धस यांची प्रतिक्रिया.
Suresh Dhas
Suresh DhasSarkarnama
Published on
Updated on

Beed Politics : बीडमधील संतोष देशमुख यांच्या हत्येने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी आज मंत्रि‍पदाचा राजीनामा दिला.

तत्पूर्वी अजित पवार धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार की नाही घेणार, यावरून भाजप आमदार सुरेश धस यांच्या मनात शंका होती. त्यावेळी आमदार धस यांनी, अजितदादांना मुंडे यांच्यामुळे तुमचा पक्ष जनतेच्या मनात क्लिन बोल्ड होत चालला आहे, असा टोला लगावला.

भाजप आमदार सुरेश धस म्हणाले, "अजितदादा (Ajit Pawar) तुमचा पक्ष जनतेच्या मनात क्लिन बोल्ड होत चालला आहे. तुमच्या पक्षाला लेफ्ट साईडला जागा राहिलेली नाही. मिडल स्टंप गेला आहे अन् ऑफ स्टंप देखील गेलेला आहे. धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला, आणि हे जर केले, तर लोक म्हणतील बरं केलं".

Suresh Dhas
Santosh Deshmukh murder : संतापजनक! संतोष देशमुखांना मारून मारून पाईपाचे 15 तुकडे पडले...

धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या आधारामुळे हे सर्व झाले आहे. हे कोणाचेही नाही. हमारे पिछे आका है. आकापेक्षा मोठा आका आहे. ही गुर्मी या लोकांच्या मनामध्ये आहे. एवढं मोठं कांड होऊन देखील अजितदादा निर्णय घेतात की नाही, यावर सुरेश धस यांनी शंका उपस्थित केली होती.

Suresh Dhas
Dhananjay Munde On Uddhav Thackeray : दोन महिन्यांपासून फोटो फडणवीसांकडे होते, अधिवेशन काळात बाहेर कसे? ठाकरेंना 'टायमिंगवर' संशय

अजित पवार यांना सुरेश धस यांच्या शंकेवरून डिवचल्यावर त्यांनी प्रश्न करणाऱ्या माध्यम प्रतिनिधींकडे एकटक बघत राहिले. यानंतर त्यांनी विधानभवन परिसरात येत, धनंजय मुंडे यांनी नैतिकतेवर राजीनामा दिला असल्याचे सांगितले. पण धनंजय मुंडे यांनी राजीनामा देताना, वैद्यकीय कारण पुढे केले. यावरून आता गोंधळ सुरू झाला आहे.

9 डिसेंबर 2024 रोजी सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली. आज या घटनेला तीन महिने होतील. या घटनेचा मास्टरमाईंड धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड असल्याचा संशय आहे. यावरून धनंजय मुंडे यांच्या मंत्रि‍पदाची मागणी जोर धरली होती. यातच सामाजिक कार्यकर्त्या अजंली दमानिया यांनी मुंडे यांच्याकडे कृषि खाते असताना, झालेल्या घोटाळ्यांवरून घेरलं.

भाजप आमदार सुरेश धस यांनी संतोष देशमुख यांच्या हत्येवरून नागपूर अधिवेशन गाजवले. बीडमधील सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्र येऊन धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली. अजितदादांनी नैतिकता दाखवून धनंजय मुंडे यांनी निर्णय घ्यावा, असे सूचक विधान केले होते. तरी देखील मुंडे यांनी निर्णय घेतला नाही.

संतोष देशमुख यांची क्रूरपद्धतीने केलेल्या हत्येचे फोटो, व्हिडिओ व्हायरल झाल्याने संतापाची लाट उसळल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंडे यांना राजीनामा देण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार मुंडे यांनी आज राजीनामा दिला. तत्पूर्वी सुरेश धस यांनी अजितदादांचा पक्ष मुंडेंमुळे जनतेच्या पक्षात क्लिन बोल्ड झाल्याचा टोला लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com