Beed News : बीड कारागृहात काय चाललंय? पोलिस महानिरीक्षकांनी दिली भेट, तपासणीत काय आढळलं?

Beed Jail Inspection: बीड कारागृहातील व्हीआयपी सुविधांचे आरोप, मोबाईल वापर आणि कटाच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर कारागृह महानिरीक्षक योगेश देसाई यांनी पाहणी केली. अंबाजोगाईतील प्रस्तावित कारागृहाच्या जागेचीही तपासणी केली.
Beed Jail Inspection
Beed Jail InspectionSarkarnama
Published on: 
Updated on: 

Beed Police News : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला बीड कारागृहात व्हीआयपी सुविधा दिल्या जात असल्यापासून ते कारागृहातून मोबाईलद्वारे कट रचल्याच्या आरोपांपर्यंत अनेक प्रश्न उपस्थित झाले. या पार्श्वभूमीवर कारागृह प्रशासनाच्या कामकाजाची तपासणी करण्यासाठी राज्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक (कारागृह) योगेश देसाई यांनी बीड जिल्हा कारागृहाला प्रत्यक्ष भेट दिली.

बीड मध्यवर्ती कारागृहात वाल्मीक कराडसह त्याच्या साथीदारांना व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात असल्याच्या आरोपाने राज्यभरात खळबळ उडाली. खासदार बजरंग सोनवणे, धनंजय देशमुख, खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्यापर्यंत या प्रकाराची लेखी तक्रार केली होती.

बीड कारागृह प्रशासनाने वेळोवेळी आरोप फेटाळले, पोलिस महासंचालकांनी जिल्ह्याचा दौरा करत कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला. त्यानंतर राज्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक (कारागृह) योगेश देसाई यांनी नुकतीच बीडमध्ये थेट धडक देत बीड कारागृहात काय चाललंय? याची शहानिशा केली. विलास घुले यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात खासदार बजरंग सोनवणे यांच्या सुपुत्राला खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी बीडच्या जिल्हा कारागृहातून कट रचल्याचा गंभीर आरोप राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली होती.

Beed Jail Inspection
Ashok Patil Nilangekar : गोकुळसारखी परिस्थिती येऊ द्यायची नसेल तर पंधरा संचालक निवडून द्या; अशोक पाटील निलंगेकरांनी घेतला धसका

याप्रकरणी खासदार बजरंग सोनवणे आणि दिवंगत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी थेट कारागृह महानिरीक्षकांकडे लेखी तक्रार देत सखोल चौकशीची मागणी केली होती. या गंभीर तक्रारींची दखल घेत प्रशासनाकडून तब्बल तीन वेगवेगळ्या उच्चस्तरीय पथकांद्वारे बीड जिल्हा कारागृहाची सखोल पाहणी करण्यात आली. या तिन्ही पथकांच्या कसून तपासात कारागृहात कोणताही कट रचल्याचे किंवा तांत्रिक दोष आढळलेला नाही, असा अहवाल समोर आला आहे.

यातच आता पोलीस महानिरीक्षक योगेश देसाई यांनी दोन दिवसांपूर्वी खुद्द बीड जिल्हा कारागृहाला प्रत्यक्ष भेट देत कानाकोपऱ्याची पाहणी करत संशयाचे जाळे दूर केले. काही दिवसांपूर्वी विलास घुले यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणावरून बीड जिल्ह्यात वातावरण चांगलेच तापले होते. खासदार बजरंग सोनवणे यांनी पत्रकार परिषद घेत, संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याने कारागृहातून मोबाईलचा वापर करून कट रचल्याचा आणि सोनवणे यांच्या मुलाला गोवण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप केला होता.

या प्रकरणी खासदार सोनवणे तसेच धनंजय देशमुख यांनी कारागृह महानिरीक्षकांकडे कठोर कारवाईची मागणी केली होती. या घडामोडींमुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी चलबिचल पाहायला मिळाली होती. या तक्रारींनंतर वरिष्ठ पातळीवरून तातडीने सूत्रे हलली. छत्रपती संभाजीनगर कारागृह अधीक्षक यांचे दक्षता पथक, पुणे येथील विशेष दक्षता पथक आणि खुद्द महानिरीक्षक कार्यालयाच्या पथकाने बीड जिल्हा कारागृहात प्रत्यक्ष धडक देत सखोल पाहणी केली. कारागृहाची सुरक्षा व्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेरे, ॲलन कॉल प्रणाली, कैद्यांच्या भेटी आणि वाल्मिक कराडच्या कोठडीवरील १२ हाय-टेक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज यांची सूक्ष्म पडताळणी करण्यात आली.

Beed Jail Inspection
Manoj Jarange Patil : वैभव चव्हाणच्या कुटुंबियांची मनोज जरागेंनी घेतली भेट; फास्ट ट्रॅक खटला चालवण्यासह केली 'ही' मोठी मागणी

या तिन्ही स्वतंत्र पथकांच्या तपासात कारागृहातून कोणताही मोबाईलचा गैरवापर झाल्याचे किंवा कट रचल्याचे पुरावे निष्पन्न झालेले नाहीत. दरम्यान, प्रकरणाचे गांभीर्य ओळखून राज्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक (कारागृह) योगेश देसाई यांनी स्वतः बीड जिल्हा कारागृहाला प्रत्यक्ष भेट दिली. यावेळी त्यांनी कारागृहातील सुरक्षिततेचा आढावा घेत आलेल्या सर्व तक्रारींची कसून चौकशी केली. बीड जिल्हा कारागृहात सध्या क्षमतेपेक्षा कैद्यांची संख्या कैकपटीने अधिक असल्याने मोठा ताण निर्माण होत आहे. ही बाब लक्षात घेऊन महानिरीक्षक देसाई यांनी नवीन मंजूर झालेल्या अंबाजोगाई येथील कारागृहाच्या प्रस्तावित जागेचीही पाहणी केली, ज्यामुळे कैद्यांच्या ओव्हरलोडचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.