Manoj Jarange Patil : वैभव चव्हाणच्या कुटुंबियांची मनोज जरागेंनी घेतली भेट; फास्ट ट्रॅक खटला चालवण्यासह केली 'ही' मोठी मागणी

Vaibhav Chavan Case: वैभव चव्हाण यांच्या मृत्यूप्रकरणी मनोज जरांगे पाटील यांनी कुटुंबीयांची भेट घेतली. एसआयटी किंवा सीआयडी चौकशी आणि फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवण्याची मागणी केली.
Manoj Jarange Patil demands an SIT or CID probe
Manoj Jarange Patil demands an SIT or CID probeSarkarnama
Published on: 
Updated on: 

Beed Crime News : बीडच्या नवगण राजूरी येथील वैभव चव्हाण या तरुणाच्या मृत्यू प्रकरणाने पुन्हा एकदा जिल्ह्यातील वातावरण तापले आहे. नोकरीसाठी बोगस प्रमाणपत्र बनवणाऱ्या नागनाथ साबळे व त्याला बनावट प्रमाणपत्र देणाऱ्या कुराश संघटनेच्या विरोधात पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. वैभव चव्हाण याने हा बोगस प्रकार उघडकीस आणला म्हणून त्याला धमकावले गेले, त्याची ही आत्महत्या नसून हत्या करण्यात आली असल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी (ता. ७ नोव्हेंबर) वैभव चव्हाण याच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली.

वैभव चव्हाण यांचे बंधू, दिव्यांग आई यांनी घडलेल्या प्रकाराबद्दल संशय व्यक्त करत यातील दोषींवर कठोर कारवाईची मागणी करत न्यायाची अपेक्षा व्यक्त केली. मनोज जरांगे पाटील यांनी हे प्रकरण सरकारने गांभीर्याने घ्यावे, असे आवाहन करत या मृत्यूची एसआयटी किंवा सीआयडीकडून चौकशी करावी. तसेच हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे, अशी मागणी माध्यमांशी बोलताना केली. पारदर्शक कारभाराचा दावा करणारे हे सरकार बोगस प्रकार उघडकीस आणणाऱ्या तरूणाच्या पाठीशी उभे राहणार, की भ्रष्ट लोकांच्या हे आता आम्हाला बघायचे आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

धाराशिव येथील पोलीस भरती झालेला नागनाथ साबळे आणि त्याला बनावट प्रमाणपत्र देणाऱ्या कुराश संघटनेतील प्रतिनिधी विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. वैभव चव्हाण याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गणेश चव्हाण यांच्या फिर्यादीवरून शुक्रवारी रात्री उशिरा हा गुन्हा दाखल करण्यात आला.खेळाडू असल्याचे बोगस प्रमाणपत्र सादर करुन नोकरी मिळवणार्‍यांचे रॅकेट उघडकीस आणणार्‍या नवगण राजुरी येथील वैभव चव्हाण याचा मृतदेह गुरुवारी आढळून आला होता.

Manoj Jarange Patil demands an SIT or CID probe
Ashok Patil Nilangekar : गोकुळसारखी परिस्थिती येऊ द्यायची नसेल तर पंधरा संचालक निवडून द्या; अशोक पाटील निलंगेकरांनी घेतला धसका

"हुशार विद्यार्थ्यानी जर पारदर्शक एखादा विषय करायचा ठरवला तर त्यांचे असेच खून होणार आहेत का? कारण खून शब्द आपण कशावरून तो वापरतोय की आता त्यांनी फोटो दाखवलेत. त्या फोटोमध्ये त्यांच्या अंगावरती प्रचंड जखमा आहेत. मग हा घातपात असायला पाहिजे", अशी शंका जरांगे पाटील यांनी व्यक्त केली.

या घटनेला आत्महत्येचे स्वरूप जाणून-बुजून दिलं जातंय का? का संघटनेला सरकारला पाठीशी घालायचंय? असा सवाल जरांगे पाटील यांनी केला. "बीडच्या एसपी साहेबांना सांगणे आहे, की याचा तपास आणि शोध घेणं खूप गरजेचे आहे. ही आत्महत्या असू शकत नाही, त्यांच्या त्या फोटोवरून वाटतंय. त्यांचा पोस्टमार्टम रिपोर्ट तर येईलच. परंतु, जे घोटाळेबाज लोक आहेत, भले त्याच्यात काही सरकारचे लोक असणार आहेत. त्यामुळे जर वाचवण्याचा प्रयत्न असेल, तर हे तुम्हाला जड जाईल, असा इशाराही जरांगे पाटील यांनी यावेळी दिला.

Manoj Jarange Patil demands an SIT or CID probe
Vaibhav Chavan : बोगस क्रीडा प्रमाणपत्रांविरोधात आवाज उठवण जीवावर बेतलं! वैभव चव्हाण मृत्यूप्रकरणी अखेर गुन्हा दाखल

"एका माऊलीच्या लेकाचा जीव गेलाय, त्यांची आई पूर्ण अपंग आहे, इतक्या वाईट परिस्थितीत एखादा घोटाळा बाहेर काढल्यानंतर जर असं होणार असेल, तर सरकार नेमकं कोणाकडून आहे, घोटाळे करणाऱ्यांकडून की घोटाळे बाहेर काढणाऱ्या एका हुशार विद्यार्थ्यांकडून? या तरूणाचा बळी गेला आहे, त्याला जे कोणी जबाबदार असतील त्यांचा शोध घेणे गरजेचे आहे. फोटोवरून ही आत्महत्या अजिबात वाटत नाहीये, हा शंभर टक्के घातपात आहे, असा संशयही जरांगे पाटील यांनी व्यक्त केला.