Beed district blast news : बीड स्फोटात धक्कादायक अपडेट समोर; आरोपीनं जिलेटीन स्फोटकांबरोबर बनवलं 'रील', कायद्याचे 'तीन-तेरा'?

Explosion Prayer Site Ardhamsala village Georai Beed suspect recorded video : बीड जिल्हा गेवराई मधील अर्धमसला गावातील प्रार्थनास्थळी झालेल्या स्फोटापूर्वी संशयित आरोपी विजय गव्हाणे याने जिलेटीन स्फोटकांबरोबर व्हिडिओ बनवल्याचे समोर आलं आहे.
Beed district blast news
Beed district blast newsSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra crime news : बीडच्या गेवराई तालुक्यातील अर्धमसला गावातील प्रार्थनास्थळी झालेल्या स्फोटप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

संशयित आरोपी विशाल गव्हाणे यांनी स्फोटांबरोबर व्हिडिओ काढला होता. समाज माध्यमांवर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या घटनेत बीड पोलिसांना हा व्हिडिओ भक्कम पुरावा ठरणार आहे. परंतु जिलेटीन स्फोटकं त्याने कोठून मिळवली, याचा तपासात बीड पोलिसांनी वेग घेतला आहे. यात काही धक्कादायक खुलासे तपासात समोर येण्याची शक्यता बीड पोलिसांकडून वर्तवली जात आहे.

बीडमधील (BEED) गेवराई इथं आज पहाटे एका प्रार्थनास्थळी जिलेटीन स्फोटकांचा वापर करून स्फोट घडवून आणला. यामुळे प्रार्थनास्थळाचे मोठे नुकसान झाले. या घटनेमुळे गेवराई तालुक्यात तणावाचे वातावरण आहे. अर्धमसला गावातील प्रार्थनास्थळाबरोबर बीड जिल्ह्यातील संवेदनशील भागात पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे.

Beed district blast news
Beed District Blast : बीड स्फोटानं हादरलं; प्रार्थनास्थळी 'जिलेटीन'ने स्फोट घडवून आणला, दोघा युवकांना अटक

पोलिसांनी स्फोटाच्या घटनेनंतर अवघ्या काही वेळातच दोघांना संशयितांना अटक केली. या दोघांकडून धक्कादायक अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. यात महत्त्वाचा पुरावे पोलिसांना सापडला आहे. संशयित विजय गव्हाने याने प्रार्थनास्थळात स्फोट घडवून आणण्यापूर्वी जिलेटीन स्फोटकांबरोबर व्हिडिओ (Video) बनवला होता. हा व्हिडिओ पोलिसांना सापडला आहे.

Beed district blast news
Shiv Sena vs Kunal Kamra : 'टीका हा लोकशाहीचा आत्मा, हे मोदींचे म्हणणे शिंदेंना मान्य नाही का?' काँग्रेसच्या सपकाळांनी महायुतीला दाखवला आरसा

संशयित आरोपी विजय गव्हाणे याने प्रार्थनास्थळात स्फोट करण्यापूर्वी बनवलेल्या 'रील'मुळे बीडमध्ये कायद्याचा धाक राहिलाच, असेच दिसते. 'शिस्तीत रहा बेट्या, मी अंगार, भंगार नाय रे', असे गाणं लावून, हातात जिलेटीनच्या कांड्या आणि तोंडात सिगारेट ठेवून हे 'रील' बनवले आहे.

या स्फोटानंतर गावात तणावाचे वातावरण आहे. संशयित आरोपी विजय गव्हाणेबरोबर श्रीराम सागडे याला देखील पोलिसांनी अटक केली आहे. संशयित आरोपींनी हा कट कधी, केव्हा आणि कुठे रचला याची माहिती घेत आहे. याशिवाय जिलेटीन स्फोटकं कोठून मिळवली, या आरोपींना कोणी मदत केली. जिलेटीन स्फोटकांनी वाहतूक कशी आणि कोणी केली, याच्या तपासासाठी बीड पोलिसांनी वेग घेतला आहे. यातून धक्कादायक अशी माहिती समोर येण्याची शक्यता बीड पोलिसांकडून वर्तवली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com