Beed District Blast : बीड स्फोटानं हादरलं; प्रार्थनास्थळी 'जिलेटीन'ने स्फोट घडवून आणला, दोघा युवकांना अटक

Explosion Prayer Place Ardhmasla Georai Beed district Superintendent Police Navneet Kanwat : बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील अर्धमसला गावातील प्रार्थनास्थळी केलेल्या स्फोटाप्रकरणी दोघांना अटक केल्याची माहिती पोलिस अधीक्षक नवनीत कावत यांनी दिली.
Beed District Blast
Beed District Blast Sarkarnama
Published on
Updated on

Maharashtra police news : बीड जिल्हा कोणत्या ना कोणत्या कारणाने गाजत आहे. आता गेवराई तालुक्यातील अर्धमसला गावातील एका प्रार्थनास्थळात पहाटे स्फोट झाला. जिलेटीन स्फोटकांनी घडवून आणलेल्या स्फोटात दोघा युवकांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक नवनीत कावत यांनी दिली.

या स्फोट प्रकरणाचा हेतू आणि घटनेशी सर्वांवर कडक कारवाई होणार असल्याचे संकेत नवनीत कावत यांनी दिली. दरम्यान, हिंदू नववर्षाच्या स्वागतालाच, गुढीपाडव्याच्या सणाच्या दिवशीच हा प्रकार झाल्याने बीड पोलिसांनी जिल्ह्यातील संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवला आहे. तसेच शांतता कमिटीची बैठक घेऊन दोन्ही बाजूने शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बीडच्या (BEED) गेवराई तालुक्यातील अर्धमसला गावात मध्यरात्रीनंतर साडेतीन ते पहाटे चार वाजण्याच्या सुमारास गावातील दोघा युवकांच्या संशयास्पद हालचाली सुरू होत्या. हे दोघे युवक प्रार्थनास्थळामध्ये घुसले अन् तिथे जिलेटीन या स्फोटकांचा वापर करत स्फोट घडवून आणला. स्फोट घडवून आणल्यानंतर प्रार्थनास्थळाच्या भिंतीला तडे गेले. तसेच काही भागाचे मोठे नुकसान झाले.

Beed District Blast
Shiv Sena Politics Maharashtra : ठाकरे-शिंदे शिवसेना एकत्र येण्याच्या 'मुहूर्ता'ची चर्चा; होळीनंतर गुढीपाडव्याच्या शोभायात्रेत संकेत?

या स्फोटाची माहिती पोलिसांना (Police) मिळताच, त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेने बीड जिल्ह्यात खळबळ उडाली होती. पोलिस अधीक्षक नवनीत कावत यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अर्धमसला गावातील प्रार्थनास्थळाला भेट दिली. त्यांच्यापाठोपाठ छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्रा यांनी देखील घटनास्थळाची पाहणी केली.

Beed District Blast
Devendra Fadnavis Politics: सिंहस्थ कुंभमेळ्यात भाजपचीच चलती; मित्रपक्षांच्या मंत्र्यांना दूर ठेवले!

बीडमधील तलवाडा पोलिसांनी या स्फोटाप्रकरणी दोघा युवकांना अटक करण्यात आली आहे. बॉम्बशोधक पथक आणि फॉरेन्सिक पथकाकडून या ठिकाणी तपासणी करण्यात आली. गावातील स्थानिक वादातून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. पोलिसांनी गावासह बीड जिल्ह्यातील संवेदनशील भागातील बंदोबस्तात वाढ करताना, शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

दोघांना अटक

पोलिस अधीक्षक नवनीत कावत म्हणाले, "गावच्या सरपंचाकडून पोलिसांना माहिती मिळाली. प्रार्थनास्थळात जाऊन जिलेटीने तिथे स्फोट करण्यात आला, अशी ही माहिती होती. या स्फोटाप्रकरणात लगेच पोलिसांनी सर्च आॅपरेशन राबवून पहाटे सहा वाजता दोन युवकांना अटक केली. याप्रकरणी फिर्याद दाखल करून घेत, वेगवेगळी कलम लावण्यात आली आहे. शांतता कमिटीचे बैठक झाली असून शांतता राखण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे".

गुन्ह्याची व्याप्ती मोठी

'हा प्रकार गंभीर आहे. कायदा हातात घेण्याचा प्रकार असून, या घटनेची कसून चौकशी केली जाणार आहे. स्फोटक कोठून आणले, त्याची वाहतूक सर्व पातळीवर कसून चौकशी होईल. यात जो कोणी असेल, त्यांना आरोपी केले जाईल', असे पोलिस अधीक्षक नवनीत कावत यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com