Dhananjay Munde : 'बीडमध्ये खडाही पडला, पावती माझ्या नावावर' : सततच्या आरोपांमुळे वैतागलेल्या धनंजय मुंडेंची खदखद बाहेर

Dhananjay Munde is upset over allegations : बीडमध्ये घडणाऱ्या प्रत्येक घटनेशी आपले नाव जोडले जात असल्याने धनंजय मुंडे यांनी नाराजी व्यक्त केली. सततच्या आरोपांवर त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली.
Dhananjay Munde reacts to continuous allegations
Dhananjay Munde reacts to continuous allegationsSarkarnama
Published on
Updated on

Dhananjay Munde Beed controversy: बीड जिल्ह्यात एखादी घटना घडली की त्याचा संबंध माझ्याशी जोडण्याची सवय काही जणांना लागली आहे, अशी खंत माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी परळी येथे आयोजित कार्यक्रमात व्यक्त केली. गेल्या काही काळापासून सातत्याने होत असलेल्या आरोपांमुळे त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करत विरोधकांवर टीका केली.

यावेळी बोलताना धनंजय मुंडे म्हणाले, "काल माझ्या आयुष्यात मी कधी नव्हतो इतका अस्वस्थ होतो. बीडमध्ये कुठलाही खडा पडला तरी त्याची पावती माझ्या नावावर फाडली जाते." या शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त करत जिल्ह्यातील कोणत्याही घडामोडीसाठी स्वतःलाच जबाबदार धरले जात असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.

Dhananjay Munde reacts to continuous allegations
CJP Protest : मोर्चापूर्वी जंतर-मंतरवर पोलिसांनी आणला दगडांनी भरलेले ट्रक; VIDEO शेअर करत अभिजीत दीपकेंचा खळबळजनक आरोप, म्हणाले, "आंदोलनकर्त्यांवर..."

ते पुढे म्हणाले की, बीडमध्ये कोणत्याही विषयावर चर्चा झाली, कोणतीही घटना घडली किंवा कोणत्याही समाजाशी संबंधित प्रश्न निर्माण झाला, तरी त्यात आपले नाव ओढले जाते. अनेक ठिकाणी आपल्या विरोधात भाषणे केली जातात. मात्र आपण नेमके कोणाचे नुकसान केले किंवा कोणत्या चुकीसाठी सतत लक्ष्य केले जाते, असा प्रश्न त्यांनाही पडत असल्याचे त्यांनी सांगितले.

"मी संघर्षातून पुढे आलो आहे. पुरावा हातात घेतल्याशिवाय कोणावरही आरोप करत नाही. एका व्यक्तीला बदनाम करून या भागाची प्रगती नाकारता येणार नाही," असेही धनंजय मुंडे यांनी ठामपणे सांगितले. कोणत्याही आरोपांना घाबरणार नसल्याचे सांगत त्यांनी संघर्षमय आयुष्यामुळे संकटांना सामोरे जाण्याची ताकद मिळाल्याचे नमूद केले.

Dhananjay Munde reacts to continuous allegations
Narayan Kuche Convoy Accident : मोठी बातमी! आमदार नारायण कुचे यांच्या ताफ्यातील वाहनाचा भीषण अपघात; तिघांची प्रकृती चिंताजनक

मुंडे यांनी विकासाच्या मुद्द्यावरही भाष्य केले. एखाद्या व्यक्तीविरोधात राजकारण करण्याच्या नादात संपूर्ण भागाच्या विकासाला अडथळा निर्माण होत असल्याचे त्यांनी म्हटले. एका व्यक्तीची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करून गाव, तालुका किंवा जिल्ह्याची प्रगती रोखता येत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

सिमेंट कारखान्याच्या उभारणीचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, हा उद्योग परिसरात येण्यासाठी अनेक स्तरांवर प्रयत्न करण्यात आले होते. जमीन उपलब्ध करून देण्यापासून विविध प्रशासकीय प्रक्रियांपर्यंत सर्व बाबींमध्ये सहकार्य करण्यात आले. कोणताही आर्थिक लाभ न घेता आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतरच हा प्रकल्प उभा राहिला, असेही त्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com