Beed : अपघाताची सीआयडी चौकशी होणार असल्याने ज्योती मेटेंनी मानले सरकारचे आभार

स्व. मेटे साहेब ज्या मराठा आरक्षणाच्या बैठकी साठी जात होते त्या प्रश्नांची तातडीने सोडवणूक करावी, हीच त्यांना खरी श्रद्धांजली असेल. ( Shivsangram, Joyti Mete)
Jyoti Mete News, Beed
Jyoti Mete News, BeedSarkarnama
Published on
Updated on

बीड : शिवसंग्रामचे अध्यक्ष माजी आमदार विनायक मेटे यांचा अपघाती मृत्यू झाला. या मृत्यूबद्दल अनेक शंका उपस्थितीत केलेल्या गेल्या होत्या. (Beed) हा घात आहे की अपघात? असा प्रश्न खुद्द मेटे कुटुंबियांनीच उपस्थितीत केला होता. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी (Vinayak Mete) मेटेंच्या अपघाताची सीआयडी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयाबद्दल ज्योती मेटे यांनी सरकारचे आभार मानले आहेत.

शिवाय महामार्गावर अपघात झाल्यानंतर तातडीने मदत मिळाली तर अनेकांचे प्राण वाचतील, अशी अपेक्षाही व्यक्त केली. राज्य सरकारने स्वर्गीय विनायक मेटे यांच्या अपघाताची सीआयडी चौकशी दिल्याने, मेटेंच्या पत्नी ज्योती मेटे यांनी राज्य सरकारचे आभार मानले आहेत. (Marathwada) त्याचबरोबर महामार्गावर अपघाताच्या वेळी लवकर मदत मिळाली तर अनेकांचे जीव वाचतील.

बीड शहरातील तुकाई निवासस्थानी ज्योती मेटे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. ज्योती मेटे म्हणाल्या, स्वर्गीय विनायक मेटे साहेब यांच्या अपघाती मृत्यूची चौकशी राज्य सरकारने सीआयडीकडे चौकशी दिली. त्यामुळे मेटे परिवार आणि शिव संग्राम आभारी आहे. महामार्गावरील अपघातात लवकरात लवकर मदत मिळाली तर शून्य मृत्यू होतील.

Jyoti Mete News, Beed
Abdul Sattar : लोकल गाडीत बसण्याची इच्छा होती, पण मुख्यमंत्र्यांनी दिली लक्झरी..

शासनाने या बाबीची दखल घेवून ठोस उपाय योजना करावी. स्व. मेटे साहेब ज्या मराठा आरक्षणाच्या बैठकी साठी जात होते त्या प्रश्नांची तातडीने सोडवणूक करावी, हीच त्यांना खरी श्रद्धांजली असेल असेही ज्योती मेटे म्हणाल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com