Beed Lok Sabha Political News : बीड लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या पंकजा मुंडे आघाडीवर असल्याचे स्पष्ट होत आहे. टीव्ही 9 पोलस्ट्राट एक्झिट पोलनुसार बीडमधून शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना सलग दुसऱ्यांदा पराभवाला सामोरे जावे लागणार आहे. येथून नेमका काय निकाल लागणार, हे 4 जून रोजी स्पष्ट होणार असले तरी आता सर्व्हेनुसार मात्र मुंडेंना मतदारांनी कौल दिल्याचे सांगितले जात आहे.
मराठवड्यातील जालन्यात मराठा आंदोलनाचा धक्का लोकसभा निवडणुकी सत्ताधाऱ्यांना बसण्याची शक्यता वर्तवली जात होती. या आंदोलनामुळे दोन मोठे समाजातील मतादारांत ध्रुवीकरण झाल्याचे निरीक्षण राजकीय वर्तुळात नोंदवले गेले. हे कुणाच्या पथ्यावर पडणार, आणि फटका बसणार हे निकालादिवशीच स्पष्ट होणार आहे. तत्पुर्वी पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार बीडमध्ये पंकजा मुंडेंना कौल मिळत असल्याचे सांगण्यात येत आहे.
बीड. जालना आणि परभणी या तीन लोकसभा मतदारसंघात मराठा आणि ओबीसी फॅक्टर मोठ्या प्रमाणात दिसून आला. त्यानुसार बीडमध्ये भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे आणि शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे यांच्यात जोरदार लढत झाली. यात मुंडे बाजी मारणार असल्याचे आता एक्झिट पोलनुसार समोर येत आहे.
बजरंग सोनवणे सलग दुसऱ्यांदा बीडमधून लोकसभा निवडणूक लढवत आहेत. गेल्या वेळी 2019 मध्ये सोनवणेंचा भाजपच्या प्रीतम मुंडेंनी मोठ्या फरकाने पराभव केला होता. एक्झिट पोलनुसार सोनवणेंना यावेळीही पराभवाची धूळ चाखावी लागणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र निकालादिवशी नेमका काय निकाल लागणार, हेच पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.