Beed Lok Sabha News : बीडमधून ओबीसी बहुजन पार्टीची उमेदवारी यशवंत गायकेंना; फटका कोणाला ?

Political News : सर्वच पक्षांकडून उमेदवार घोषित केले जात आहेत. ओबीसी बहुजन पार्टीने बीड लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवाराची घोषणा केली. यशवंत गायके यांना बीडचे उमेदवार जाहीर करण्यात आले.
T.P. Munde
T.P. Munde Sarkarnama

Beed News : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी व विरोधी पक्षांकडून निवडणुकीची तयारी सुरु आहे. सर्वच पक्षांकडून उमेदवार घोषित केले जात आहेत. ओबीसी बहुजन पार्टीने बीड लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवाराची घोषणा केली.

यशवंत गायके बीडला उमेदवार असल्याचे पार्टीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रा. टी. पी. मुंडे म्हणाले. ओबीसी आंदोलनात पंकजा मुंडे (Pankja Munde) कुठे होत्या, असा सवालही टी. पी. मुंडे यांनी केला. आता यशवंत गायके यांच्या उमेदवारीचा फटका कोणाला बसणार, याचे गणित मांडले जात आहे.

दरम्यान, काही अडचण असल्यामुळे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) पक्षात नाहीत. मात्र, त्यांची साथ व आशिर्वाद आम्हालाच असल्याचे सांगून त्यांना लोकसभेची उमेदवारी मिळाली तर त्यांनाही पाठींबा दिला जाईल, असेही यावेळी मुंडे यांनी जाहीर केले. (Beed Lok Sabha News)

T.P. Munde
Lok Sabha Election 2024 : खुद्द आंबेडकर परत आले तरी..! संविधानाबाबत काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

ओबीसी बहुजन पार्टी राज्यात १४ जागा लढविणार असून यात सांगलीतून प्रकाश शेंडगे, बारामतीतून महेश भागवत, सातारातून राजू कोडगे, बीडमधून यशवंत गायके, धाराशिवमधून अर्जुन सलगर, हिंगोलीतून रवी शेंडगे, शिर्डीतून अशोक आल्हाट, बुलढाणातून नंदू होडगे, उत्तर मुंबई शांताराम दिघे आदींना उमेदवाऱ्या जाहीरर करण्यात आल्या आहेत. तर, सहा ठिकाणी पक्षाने पाठींबा दिल्याचे प्रा. टी. पी. मुंडे म्हणाले.

यात अकोलातून प्रकाश आंबेडकर, कोल्हापूरमधून शाहू महाराज, परभणीतून महादेव जानकर, तसेच अमरावतीतून आनंदराज आंबेडकर यांना पाठींबा दिल्याचे त्यांनी सांगितले. देशाला राज्यघटना व ओबीसींना प्रथम आरक्षण देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसी आंदोलनात स्पष्ट भूमिका घेतली होती, छत्रपती शाहू महाराजांनी ओबीसींसह सर्व घटकांना प्रथम आरक्षण दिले तसेच महादेव जानकर यांनीही आंदोलनात सहभाग घेतला, आनंदराज आंबेडकर देखील डॉ. आंबेडकरांचे नातू आहेत, त्यामुळे या सर्वांना पाठींबा दिला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पक्षाचे खासदार जातनिहाय जनगनणेची पहिली मागणी करतील. या पक्षाला ओबीसी समाजाचा मोठा पाठींबा राहील, असा विश्वासही त्यांनी दिला. परळीत कालच धनगर समाजाची बैठक झाली. त्यालाही मोठा प्रतिसाद मिळाला. दरम्यान, विजय हे आमचे उद्दिष्ट असून कोणाचे मते खाणे हे आमचे टार्गेट नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ओबीसी समाजाचे आंदोलन, मेळाव्यांवेळी भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे कुठे होत्या, असा सवालही त्यांनी केला. पंकजा मुंडे ओबीसीच्या वाटत नाहीत, असेही प्रा. टी. पी. मुंडे म्हणाले.

(Edited By : Sachin Waghmare)

T.P. Munde
Beed Loksabha Election : OBC नेत्या म्हणवून घेणाऱ्या पंकजा मुंडे तेव्हा कुठे होत्या? ; टी.पी.मुंडेंचा सवाल!

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com