
Bees News : राजगौंड जातीचे अनुसुचित जमातीचे जात प्रमाणपत्र देण्यासाठी माजलगाव येथील उपविभागीय अधिकाऱ्यांच्या नावे ३० हजार रुपयांची लाच स्वीकारताना महसूल सहाय्यक व एका इसमाला लाच-लुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी माजलगावच्या उपविभागीय कार्यालयात सापळा लाऊन पकडले. कारवाई सुरू असताना कार्यालयातच जेवत असलेल्या उपविभागीय अधिकारी निलम बाफना या जेवण करत असतानाच कार्यालयातून निघून गेल्या.वैभव बाबुराव जाधव व शेख असफ शेख अहमद अशी पकडलेल्या संशयितांची नोव आहेत. (Latest Marathi News)
धारुर येथील तक्रारदार व्यक्तीच्या दोन मुलांचे, त्यांच्या भावाच्या दोन मुलांचे तसेच भावाची मुलगी आणि बहीण अशा सहा व्यक्तींचे राजगौंड या अनुसुचित जमातीचे जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी त्यांनी धारुरच्या तहसिल कार्यालयातील सेतू सुविधा केंद्रात ऑनलाईन प्रकरणे दाखल केली होती. तहसील कार्यालयाची कार्यवाही होऊन तक्रारदाराने ही सर्व सहाही प्रकरणे माजलगावच्या उपविभागीय कार्यालयात दाखल केले. या प्रमाणपत्रांसाठी उपविभागीय कार्यालयातील महसूल सहाय्यक वैभव जाधव यांने उपविभागीय अधिकाऱ्यांकडून चार प्रकरणांचे जात प्रमाणपत्र मिळवून दिले.
याचा मोबदला म्हणुन वैभव जाधव याने उपविभागीय अधिकाऱ्यांसाठी 50 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तडजोडअंती 40 हजार रुपये देण्याचे ठरले. याबाबत संबंधिताने बीडच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या 40 हजार रुपयांपैकी 30 हजार रुपये बुधवारी स्वीकारण्याचे वैभव जाधव याने मान्य केले. यानुसार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. पंचा समक्ष शेख असेफ याने वैभव जाधव यांचे सांगण्यावरुन उपविभागीय कार्यालयात लाचेची रक्कम स्विकारली. या दोघांविरुद्ध माजलगाव शहर येथे गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई झाली तेव्हा उपविभागीय अधिकारी निलम बाफणा जेवत होत्या. कारवाईची खबर लागताच त्या जेवता - जेवता निघून गेल्या. दरम्यान, वैभव जाधव याने उपविभागीय अधिकारी यांच्यासाठी लाच मागीतली व स्वीकारली अशी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या दफ्तरातही नोंद आहे. वैभव जाधव व शेख असेफ या दोघांनाही अटक करण्यात आली. कारवाईत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे उप-अधीक्षक शंकर शिंदे, सुरेश सांगळे, हनुमान गोरे, संतोष राठोड, भरत गारदे, अविनाश गवळी, गणेश म्हेत्रे यांनी सहभाग घेतला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.