Beed News : मराठा आरक्षणासाठी मराठा समाज (Maratha Reservation) आक्रमक झाला आहे. राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे. मात्र, बीड जिल्ह्यात या आंदोलनाला गालबोट लागले. शहरात हिंसक आंदोलन झाले या आंदोलनाचा पोलिस यंत्रणेला अंदाज नव्हता. तसेच, सकाळी माजलगावला प्रकाश सोळंके यांच्या घरावर आणि शासकीय कार्यालयांवर दगडफेक करण्यात आली. जाळपोळ अटोक्यात आणण्यासाठी खुद्द पोलिस अधीक्षक मोठा फौजफाटा घेऊन माजलगावला तळ ठोकून होते. याच काळात बीडमध्ये आंदोलन हाताबाहेर गेले.
सोमवारी (ता. ३०) सकाळी कथीत ऑडीओ क्लिपमधील संभाषणावरुन राष्ट्रवादीचे (NCP) आमदार प्रकाश सोळंके यांच्या माजलगावच्या घरावर हजारांहूनअधिक आंदोलकांनी दगडफेक केली. तसेच, दारातील वाहने जाळून बंगल्याचीही तोडफोड केली. याची माहिती मिळताच, पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर फौजफाटा घेऊन माजलगावकडे रवाना झाले. यानंतर माजलगावात आंदोलकांनी नगर पालिकेला आग लावली व सोळंके महाविद्यालयाचीही तोडफोड केली.
पंचायत समितीवरही दगडफेक आणि शहरातून मोर्चा यामुळे माजलगावची परिस्थिती अटोक्यात आणण्यासाठी पोलिस दलही प्रयत्न करत होते. या वेळेत शहरातील कार्यालये बंद केली जात होती. आंदोलकांचा राग शांत व्हावा म्हणून प्रशासनानेही संयमाची भूमिका घेतली. मात्र, मुळात बीडमध्ये आंदोलन हिंसक होईल, याचा अंदाज प्रशासनाला नव्हता.
जिल्ह्यात जाळपोळ आणि दगडफेकीचे प्रकारही वाढले. त्यामुळे प्रशासनाने रात्री शहरात मोठ्या फौजफाट्यासह गस्त वाढविली. खुद्द जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक, पोलिस (Police) अधीक्षक नंदकुमार ठाकूर रस्त्यावर उरतल्याने परिस्थिती अटोक्यात आली आहे.
Edited by : Amol Jaybhaye
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.