Eknath Shinde Meet Governor : मराठा आंदोलन पेटले, मुख्यमंत्री शिंदे अचानक राज्यपालांच्या भेटीला; चर्चांना उधाण

Maratha Reservation News : या भेटीचं कारण अद्याप अस्पष्ट, पण...
Eknath Shinde - Governer Ramesh Bais
Eknath Shinde - Governer Ramesh Bais Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : मराठा आंदोलनाचा वणवा राज्यभर पेटला आहे. या आंदोलनाची झळ राजकीय नेत्यांपासून सर्वसामान्यांनादेखील बसण्यास सुरुवात झाली आहे. राज्यात एकीकडे मराठा आंदोलन पेटलं असतानाच अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्यपाल रमेश बैस यांच्या भेटीसाठी सोमवारी रात्री राजभवनावर दाखल झाले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) हे सोमवारी राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली. त्यांच्यात जवळपास अर्धा तास चर्चा झाली. या भेटीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. यानंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधण्यास नकार दिला आहे. मात्र, मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात भेट होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

Eknath Shinde - Governer Ramesh Bais
Manoj Jarange Patil : माणूस निर्धाराचा पक्का, दीड वर्षापासून पाहिला नाही घराचा उंबरा!

याचवेळी भाजपची फडणवीसांच्या सागर बंगल्यावर कोअर कमिटीची बैठक होत आहे. या बैठकीत मराठा आरक्षणाच्या आंदोलनावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

मराठा आरक्षणावरून वातावरण तापलेले आहेत. याचदरम्यान, पडद्यामागे अनेक राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्यपालांच्या (Ramesh Bais) भेटीत मराठा आरक्षण, आंदोलनावर चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अचानक राज्यपालांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे मुख्यमंत्री शिंदे हे एकटेच राज्यपालांच्या भेटीला गेले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांना डेंग्यू झाला आहे, तर उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या नेतृत्वात भाजपच्या कोअर समितीची बैठक बोलावण्यात आली आहे. मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. मराठा आरक्षणाबाबत सरकारने नेमलेल्या न्या. शिंदे यांच्या समितीने सरकारला आपला अहवाल सादर केला आहे.

मनोज जरांगे पाटलांकडून(Manoj Jarange Patil) अंतरवाली सराटी येथे बेमुदत उपोषण आंदोलन सुरू आहे, तर बीड, माजलगावसह राज्यात ठिकठिकाणी मराठा आंदोलन पेटले आहे. या आंदोलनात सत्ताधारी आमदार, नेत्यांची घरे, कार्यालय, गाड्या आंदोलकांनी लक्ष्य केले आहेत. याच धर्तीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Eknath Shinde - Governer Ramesh Bais
Beed Political News : पेटलेल्या बीडमधून मोठी बातमी समोर; जिल्हा प्रशासनाकडून संचारबंदी लागू

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com