Maratha Reservation:...अन्यथा जिवंत समाधी घेणार; शेतकरी नेते विनायकराव पाटलांचा सरकारला इशारा

Vinayakrao Patil : मराठा आरक्षणासाठी राज्यभरात मराठा समाज आक्रमक झाला आहे.
Maratha Reservation
Maratha ReservationSarkarnama
Published on
Updated on

Umarga News: मराठा आरक्षणासाठी राज्यभरात मराठा समाज आक्रमक झाला आहे. गेल्या सहा दिवसांपासून मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. राजकीय नेत्यांना आंदोलकांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे.

यातच काही नेत्यांनी आपल्या पदाचे राजीनामे देखील दिले आहेत. राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलनं करण्यात येत असतानाच आता शेतकरी नेते आणि सामाजिक कार्यकर्ते विनायकराव पाटील यांनी सरकारला सूचक इशारा दिला आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी सुरु केलेल्या आंदोलनाची दखल राज्य सरकारने घेतली नाही तर शुक्रवारी सायंकाळी जिवंत समाधी घेण्याचा इशारा विनायकराव पाटील यांनी दिला आहे. पाटील यांनी कवठा गावात सुरू केलेल्या आमरण उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी पत्रकार परिषद घेऊन हा निर्णय जाहीर केला आहे.

Maratha Reservation
Maratha Agitation : बीडमध्ये मराठा आरक्षण आंदोलनाचा भडका; जाणून घ्या, दिवसभरात काय जाळले अन् काय फोडले?

"मनोज जरांगे पाटील आमचा आत्मा आहे, उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. हे मला सहन होत नाही. शुक्रवारी दुपारपर्यंत सरकारने मराठा आरक्षणाचा निर्णय जाहीर करावा, अन्यथा सांयकाळी जिवंत समाधी घेणार आहे. तीन दिवसांपासून पाणी घेतले नाही आणि घेणारही नाही. प्रशासनाने जबरदस्ती करुन मला उपोषणापासून परावृत्त करु नये", असंही पाटील म्हणाले.

"आरक्षणाचा मुद्दा राजकारणासाठी होऊ नये, गरिब, रोजीरोटीसाठी महाग झालेल्या आणि मुलांच्या शिक्षण, नोकरीसाठी मराठा समाजाला आरक्षण हवं आहे. कुणबी प्रमाणपत्राचा निकष फक्त पुरावा असणाऱ्यांनाचा नको, तर तो सरसकट दिला गेला पाहिजे, पाटील म्हणाले. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही जोरदार टीका केली.

Edited By- Ganesh Thombare

Maratha Reservation
Maratha Reservation: मराठा आंदोलकांकडे मुश्रीफांनी मागितली परवानगी अन् मग घेतला 'हा' कार्यक्रम

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com