walmik karad : संतोष देशमुखांना न्याय मिळालाय सुरुवात झालीय... : वाल्मिक कराडला कोर्टाने दणका देताच धनंजय देशमुख भावूक

Dhananjay Deshmukh On Walmik Karad : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख खून खटल्यातील मुख्य आरोपी वाल्मीक कराडला न्यायालयाने दणका दिला आहे.
Walmi Karad
Walmi KaradSarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराडचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला.

  2. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने न्या. सुशील घोडेस्वार यांच्या अध्यक्षतेखाली हा निर्णय दिला.

  3. निर्णयानंतर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी न्याय व्यवस्थेवर विश्वास व्यक्त करत न्यायाची सुरुवात झाल्याचे म्हटले.

Beed News : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख खून खटल्यातील मुख्य आरोपी वाल्मीक कराडचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळला आहे. न्या. सुशील घोडेस्वार यांनी बुधवारी (ता. 17) हा फेटाळला. यानंतर संतोष देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया देत न्याय व्यवस्थेवर विश्वास असल्याचे सांगत आता आपल्याला न्याय मिळायला सुरवात झाल्याचे म्हटले आहे.

संतोष देशमुख खून खटल्यात बीडच्या सत्र न्यायालयाने जामीन नाकारल्यानंतर वाल्मीक कराड यांनी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. शुक्रवारी (ता. 12) त्यांच्या जामीन अर्जावर सहा तास प्रदीर्घ युक्तिवाद करण्यात आला होता. युक्तिवादात सरकारपक्षाच्या वालमीक कराडची अटक व तपासाबाबत काही प्रश्न उपस्थित केले होते.

मंगळवारच्या (ता. 16) सुनावणीत सरकार पक्षातर्फे मुख्य सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे आणि फिर्यादी पक्षातर्फे ॲड. नितीन गवारे यांनी आरोपींचे मुद्दे खोडून काढले होते. बुधवारी सुनावणीवेळी आरोपीचे वकील यांनी सदर गुन्ह्यातील तपासाबाबत काही आक्षेप नोंदविले. त्यांनी न्यायालयास विनंती केली की, सदर प्रकरणाची दोष निश्चिती 19 डिसेंबरला झाली असून, त्यांच्या दोष मुक्तीचा अर्ज उच्च न्यायालयात सुनावणीसाठी प्रलंबित आहे.

Walmi Karad
Walmik Karad News: साडेतीन तास युक्तिवाद; सरकारी वकिलांनी कोर्टाला 'ते' दोन महत्त्वाचे पॉईंट ठणकावून सांगितले,कराडला दणका

तोपर्यंत कराड यांच्या दोष निश्चितीला स्थगिती देण्याचे आदेश बीडच्या विशेष न्यायालयाला द्यावेत, अशीही विनंती आरोपीच्या वकिलांनी केली. उच्च न्यायालयाने सुनावणीअंती सदर प्रकरण जामीन देण्यायोग्य नसल्याने जामीन अर्ज मागे घेता की, तसा आदेश पारित करावा, असे कराडच्या वकिलांना विचारले. ज्यावर वकिलांनी आदेश करण्याची विनंती केली असता उच्च न्यायालयाने वाल्मीक कराडचा जामीन अर्ज फेटाळून लावला.

वाल्मीक कराडतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ शिरीष गुप्ते, ॲड. संकेत कुलकर्णी, तर शासनातर्फे मुख्य सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे यांनी काम पाहिले. त्यांना ॲड. सचिन सलगर यांनी सहकार्य केले. फिर्यादीतर्फे नितीन गवारे यांनी काम पाहिले. त्यांना ॲड. धनंजय पाटील यांनी सहकार्य केले. दरम्यान, या सुनावणीच्या वेळी संतोष देशमुख यांचे कुटुंब न्यायालयात हजर होते.

Walmi Karad
Walmik Karad News : 'बघून घेतो म्हणून धमकी, जेलरच्या सांगण्यावरून 'त्या' पोलिसाची तक्रार नाही; वाल्मिक,घुलेनं माफी मागितली?

FAQs :

1. वाल्मीक कराडचा जामीन कोणी फेटाळला?
➡️ मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने.

2. हा निर्णय कोणत्या न्यायाधीशांनी दिला?
➡️ न्या. सुशील घोडेस्वार यांनी.

3. वाल्मीक कराड कोणत्या प्रकरणातील आरोपी आहे?
➡️ मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील.

4. देशमुख कुटुंबाची प्रतिक्रिया काय आहे?
➡️ त्यांनी न्याय व्यवस्थेवर विश्वास व्यक्त केला आहे.

5. या निर्णयाचा पुढील खटल्यावर काय परिणाम होईल?
➡️ आरोपीविरोधातील बाजू अधिक मजबूत होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com