Beed ZP News : बीड नगरपालिकेनंतर भाजपचे मिशन झेडपी; इच्छुकांच्या मुलाखती घेणार!

Beed ZP Election 2026: आगामी काळात जिल्हा परिषदेचे 61 गट आणि 11 पंचायत समितीच्या 122 गणांची निवडणुक होणार आहे. जिल्ह्यातील बीडसह गेवराई, माजलगाव, धारुर, अंबाजोगाई आणि परळी या सहा नगरपालिकांच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या.
Beed ZP Election News
Beed ZP Election NewsSarkarnama
Published on
Updated on

BJP News : बीड नगर पालिका निवडणुकीचा धुराळा खाली पडतो न पडतो तोच आता भाजपने आगामी जिल्हा परिषद निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. निवडणुकीसाठी पक्षाचे निरीक्षक नेमत आता रविवारी बीड तालुक्यातील इच्छुकांच्या मुलाखतीही आयोजित केल्या आहेत. आगामी काळात जिल्हा परिषदेचे 61 गट आणि 11 पंचायत समितीच्या 122 गणांची निवडणुक होणार आहे. जिल्ह्यातील बीडसह गेवराई, माजलगाव, धारुर, अंबाजोगाई आणि परळी या सहा नगरपालिकांच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या.

भाजपसाठी हा निकाल थोडी खुशी थोड गम असा ठरला. मात्र, मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी या निवडणुकीसाठी त्यांची परळी सोडता उर्वरित पाच ठिकाणी तगडे पॅनल उभा केले. बीडमध्ये योगेश क्षीरसागर यांना पक्षात घेतले. बीड नगर पालिकेच्या इतिहासात भाजपने सर्व 52 नगरसेवक आणि नगराध्यक्षपदाचीही निवडणुक लढविली. निकालात भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार डॉ. ज्योती घुंबरे दुसऱ्या स्थानी राहील्या. मात्र, पक्षाचे 15 नगरसेवक विजयी झाले.

आता डॉ. सारिका क्षीरसागर भाजपच्या गटनेत्या झाल्या असून त्यांना उपनगराध्यक्षपदासाठीचे प्रयत्न सुरु झाले आहेत. गेवराईत भाजपच्या गिता पवार विजयी झाल्या. तर, अंबाजोगाईतही भाजपचे नंदकिशोर मुंदडा आघाडीच्या माध्यमातून नगराध्यक्ष झाले. दरम्यान, पक्षाने आता आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोटबांधणी सुरु केली आहे. योगेश क्षीरसागर, माधव निर्मळ, सतीश मुंडे, संजय आंधळे आदींची निरीक्षक म्हणून नेमणूक केली आहे.

बीड (Beed) तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुक लढवू इच्छीणाऱ्यांच्या मुलाखती रविवारी होणार आहेत. दरम्यान, जिल्ह्यात महायुतीतील भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस हेच प्रमुख प्रतिस्पर्धी असून निवडणुकीत बीड, केजसह इतर काही तालुक्यांत राष्ट्रवादीही ताकदीने उतरु शकतो.

Beed ZP Election News
Gangster Andekar News: कुख्यात गुंड बंडू आंदेकरनं उमेदवारी अर्ज भरलाच नाही, धक्कादायक माहिती समोर

आताच्या नगरपालिका निवडणुकीचे सिंहावलोकन केले तर आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत परळी मतदार संघ वगळता उर्वरित ठिकाणी भाजप व राष्ट्रवादी कॉंग्रेस पुन्हा आमने - सामने येण्याची चिन्हे आहेत.

दरम्यान, जिल्हा परिषदेवर देखील मागच्या साडेतीन वर्षांपासून प्रशासक राज आहे. 2017 मध्ये सुरुवातीला झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस मोठा पक्ष ठरला होता. त्यावेळी ग्रामविकास मंत्री व जिल्ह्याच्या पालकमंत्री असलेल्या पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखालील भाजपला कमी जागा मिळाल्या. मात्र, भाजप, शिवसंग्राम आणि त्यावेळी राष्ट्रवादीमध्ये असलेल्या सुरेश धस यांच्या नेतृत्वाखालील सदस्य आणि काँग्रेसने एकत्र येत जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकविला होता. पुढे अडीच वर्षांनी तत्कालिन पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आणली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com