Beed politics : बीडमध्ये महायुतीत भूकंप; मुंडे बहीण-भाऊ पुन्हा आमने सामने?

Political News : बीडमध्ये महायुती होईल, अशी शक्यता वर्तवली जात असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्वबळाच्या भूमिकेमुळे महायुतीला सुरुंग लागला आहे.
Pankja munde, dhananjay munde
Pankja munde, dhananjay mundeSarkarnama
Published on
Updated on

Beed News : आगामी काळात राज्यात सर्वत्र स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची घोषणा होणार आहे. त्यासाठी सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. या निवडणुकासाठी स्थानिकची परिस्थिती पाहून निर्णय घ्यावेत, अशा सूचना महायुतीमधील भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना व अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला दिले आहेत. त्यातच या निवडणुकीच्या तोंडावरच बीड जिल्ह्यात महायुतीत भूकंप होण्याची शक्यता आहे.

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक सोमवारी पार पडली. या बैठकीत बीड जिल्ह्यातील निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे आता येत्या काळात मंत्री पंकजा मुंडे व माजी मंत्री धनंजय मुंडे समोरासमोर येण्याची शक्यता आहे. बीडमध्ये महायुती होईल, अशी शक्यता वर्तवली जात असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्वबळाच्या भूमिकेमुळे महायुतीला सुरुंग लागला आहे.

प्रदेश पातळीवरूनच जिल्हा पातळीवर परिस्थीती पाहून निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिकच्या नेत्यांना देण्यात आले होते. त्यानुसार स्थानिकस्तरावर तीन पक्षांच्या नेत्याची समिती गठीत करण्यात आली होती. त्यामुळे या समितीच्या भूमिकेकडे स्थानिकच्या नेत्याचे लक्ष लागले होते. त्यातच आता अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांची स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारी असल्याचे सांगत महायुतीमधील मित्रपक्षांना इशाराच दिला आहे.

Pankja munde, dhananjay munde
Pune BJP : फडणवीसांनी 'तो' निर्णय जाहीर करताच...पुण्यातील भाजप निष्ठावंतांचा सामुहिक राजीनाम्याचा इशारा

बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा नारा देण्यात आला आहे. 'स्थानिक पातळीवर भाजपसोबत युती होता कामा नये, स्वबळावरच निवडणूक लढवली गेली पाहिजे,' अशी स्पष्ट भावना राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी या बैठकीत व्यक्त केली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेने मित्रपक्षात अस्वस्थता पसरली आहे.

Pankja munde, dhananjay munde
Pune BJP : फडणवीसांनी 'तो' निर्णय जाहीर करताच...पुण्यातील भाजप निष्ठावंतांचा सामुहिक राजीनाम्याचा इशारा

राष्ट्रवादी काँग्रेसने बैठकीतच भाजपसोबत युती नाकारत स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्याने महायुतीला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे बीडच्या राजकारणात पुन्हा एकदा मुंडे भाऊ-बहीण आमनेसामने येण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे आता यावर पंकजा मुंडे व धनंजय मुंडे काय निर्णय घेणार याची उत्सुकता लागून राहिली आहे.

Pankja munde, dhananjay munde
Local Body Election : उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराचा उमेदवारी अर्ज भरण्याआधीच गेम झाला ! मतदारयादीतून नावच गायब

बीड जिल्ह्याचे आतापर्यंतचे राजकारण वेगळे राहिले आहे. या जिल्हयातील राजकारणावर आतापर्यंत भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षाची पकड राहिली आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या उभ्या फुटीनंतर बीड जिल्ह्यावरही मोठा परिणाम झाला होता. माजी मंत्री धनंजय मुंडेंसह (Dhananjay Munde) आमदार प्रकाश सांळुखे व विजयसिंह पंडित हे अजित पवार यांच्यासोबत गेले तर दुसरीकडे खासदार बजरंग सोनवणे, आमदार संदीप क्षीरसागर हे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबत राहिले. दुसरीकडे भाजपचे दोन आमदार जिल्ह्यात आहेत. आष्टीमध्ये सुरेश धस तर केजमध्ये नमिता मुंदडा हे दोन भाजपचे आमदार आहेत. तर जिल्ह्यात सहा पैकी पाच आमदार महायुतीचे आहेत तर एकमेव बीडचा आमदार महाविकास आघाडीचा आहे.

Pankja munde, dhananjay munde
Local Body Election : उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराचा उमेदवारी अर्ज भरण्याआधीच गेम झाला ! मतदारयादीतून नावच गायब

बीडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पारंपारिक राजकीय वैर असल्याने, महायुती केल्यास पक्षाला मोठा फटका बसेल, असे कार्यकर्त्यांचे मत आहे. या निर्णयामुळे भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यात पुन्हा एकदा थेट लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते यावर अंतिम निर्णय घेणार असले तरी, राष्ट्रवादीच्या या पवित्र्यामुळे बीडमधील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत.

Pankja munde, dhananjay munde
Jalgaon BJP Politics : महापौर पदासाठी भाजपचे नगरसेवक फोडले, आता भाजपच खिशात घालणारा नेता कोण?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com