Jalgaon BJP Politics : महापौर पदासाठी भाजपचे नगरसेवक फोडले, आता भाजपच खिशात घालणारा नेता कोण?

Girish Mahajan And Sunil Mahajan Jalgaon politics : जळगाव महापालिकेच्या राजकारणात दोन दिवसांपूर्वी मोठ्या व धक्कादायक घडामोडी घडल्या असून भाजपचे सत्तेचे स्वप्नभंग करणारे सुनील महाजन आता झाले जळगाव भाजपचे नेते झाल्याने विविध चर्चांना उधान आले आहे.
Internal Rift in BJP Over Mayor Post
Internal Rift in BJP Over Mayor PostSarkarnama
Published on
Updated on

BJP mayor post controversy in Maharashtra: जळगाव महापालिकेच्या राजकारणात दोन दिवसांपूर्वी मोठ्या व धक्कादायक घडामोडी घडल्या. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हट्टामुळे माजी महापौर जयश्री महाजन आणि त्यांचे पती सुनील महाजन हे भाजपवासी झाले. पण आता त्यांच्या या प्रवेशामुळे जळगावमध्ये खदखदीला उकळी फुटू लागली असून हा प्रवेश सोहळा स्थानिक आमदारांच्या मर्जी विरुद्ध झाल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

माजी महापौर जयश्री महाजन आणि सुनील महाजन यांच्या प्रवेशाला आमदार सुरेश भोळे यांचा प्रखर विरोध होता. तीच भावना कार्यकर्त्यांची देखील होती. त्यामुळे हा प्रवेश गेले वर्षभर रखडला होता. हा प्रवेश ज्या ठिकाणी झाला तेथील वातावरण भाजपला साजेसे नव्हते. अतिशय गोंधळात आणि रेटारेटीत हा प्रवेश झाला. भाजपच्या शिस्तबद्ध आणि पदाधिकाऱ्यांना मान देण्याची परंपरा येथे बाजूला पडल्याची येथील राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

तर माजी महापौर जयश्री महाजन आणि त्यांचे पती सुनील महाजन यांचा हा प्रवेश सोहळा भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागणारा असल्याचेही आता समोर आले आहे. तर अनेकांनी ही खदखद मनातच दाबून ठेवली असून आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांसाठी पक्ष आणखी काय करू शकतो? याचे ते उदाहरण म्हणता येईल, अशीही दबक्या आवाजात पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे.

Internal Rift in BJP Over Mayor Post
Girish Mahajan : मुख्यमंत्र्यांनी संकटमोचकांना सांगावा धाडला, मात्र गिरीश महाजन राजकीय इव्हेंट, पक्ष प्रवेश सोहळे अन् बैठकांतच रमले, शेतकऱ्यांना दिलेला शब्द विसरले!

दरम्यान महाजन यांच्या या प्रवेशाला विरोधाचे कारणही समोर आले असून जळगाव महापालिकेची ब्रिटिश कालीन पाईपलाईन काढून ती भंगारात विकल्याचा आरोप सुनील महाजन यांच्यावर आहे. जळगाव महापौर पदाच्या निवडणुकीत याच सुनील महाजन यांनी भाजपच्या नगरसेवकांना फोडले होते. तर भाजपमध्ये फूट पाडून त्यांनी पत्नी जयश्री महाजन यांना महापौर केले होते. त्यात नितीन लड्डा या महापालिकेचा कारभार हाकणाऱ्या नेत्याचाही सिंहाचा वाटा होता.

तसेच याच जयश्री महाजन यांनी विधानसभा निवडणुकीत भाजपचे सुरेश भोळे यांच्या विरोधात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाची उमेदवारी मिळवली होती. त्यामुळे भाजप विरुद्ध उमेदवारी, भाजपचेच नगरसेवक फोडून महापौर पद आणि भ्रष्टाचाराचे आरोप अशी सगळी पार्श्वभूमी असतानाही फक्त पालकमंत्र्यांच्या हट्टामुळे महाजन यांचा पक्षप्रवेश झाला आहे.

Internal Rift in BJP Over Mayor Post
Girish Mahajan: अमित शहांचा शब्द गिरीश महाजनांनी पाळला! स्थानिक आमदाराचा विरोध डावलून दिला विरोधकांना प्रवेश!

पण या प्रवेशावरून कार्यकर्ते आणि स्थानिक आमदार सुरेश भोळे यांची नाराजी समोर येत असून जलसंपदा मंत्री सध्या पक्षात खूपच जोरात आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांची, स्थानिक नेत्यांची भावना काय? यापेक्षा जमेल त्या सगळ्यांना पक्षात जमा करणे याला त्यांचे प्राधान्य असल्याचेच दिसत आहे.

दरम्यान आता भाजपच्या कार्यकर्त्यांत वेगळीच चर्चा सुरू झाली असून निवडणुकीआधी 2018 मध्ये असेच अनेक प्रवेश झाले होते. मात्र महापौर पदाच्या निवडणुकीत 2021 मध्ये हे सर्व सत्तेबरोबर अर्थात शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष सोबत गेले. त्यालाही पक्ष कसा म्हणावा, हे सगळे सुनील महाजन यांच्या तीर्थप्रसादाला भुलले, असा आरोप होत आहे. तर

माजी महापौर यांची पार्श्वभूमी एकंदर भाजपला न साजेशी असतानाही जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी हा प्रवेश कार्यक्रम केला. ज्यांनी भाजपचे नगरसेवक फोडले. महापौर पदापासून भाजपला रोखले. त्यांनाच गिरीश महाजन यांनी रेड कार्पेंट अंथरले.

आता भाजपचे कार्यकर्त्यांना काल पक्षात आलेल्या सुनील महाजन यांना आपले नेते म्हणण्याशिवाय पर्याय नाही. तर पक्षाचे निष्ठावान आमदार सुरेश भोळे आता काय करणार? ते या विरोधात थेट बोलणार की हा अपमान पचवणार? हे पाहावं लागणार आहे.

Internal Rift in BJP Over Mayor Post
Girish Mahajan : या वयात सुद्धा गिरीश महाजन काय धावले.. पाहून चाळीसगावचे सगळे तरुण थक्क!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com