Beed Election: बीडमध्ये राष्ट्रवादी-भाजपातील चिखलफेकीत आमदार क्षीरसागर शांतपणे खेळत राहिले; कोणाचं 'पार्सल' पॅक होणार?

Beed Politics: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सोबतीला घेत सर्व जागाही ताकदीने लढविल्या. माजी आमदार सय्यद सलिम यांच्या साथीने वार्डनिहाय सभा आणि बैठका घेत स्वत:चा अजेंडा मांडला. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रचारासाठी राज्य पातळीवरचा एकही नेता बोलविला नाही.
Beed Election .jpg
Beed Election .jpgSarkarnama
Published on
Updated on

Beed Politics News :बीड जिल्ह्यातील सहा नगर पालिकांचे नगराध्यक्ष व या नगर पालिकांतील 182 नगरसेवकांचा फैसला रविवारी होणार आहे. सर्वाधिक रंगतदार झालेल्या बीड नगर पालिकेच्या निकालाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. ऐनवेळी राष्ट्रवादी का्ँग्रेसमधील फुट आणि त्यातून भाजपला सर्व जागा लढता आल्या. या वेगळेपणात या दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून शेवटपर्यंत एकमेकांवर चिखलफेक सुरु असतानाच आमदार विजयसिंह पंडितांवर त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर (Sandip Kshirsagar) यांनी आपला सरळ मार्ग निवडत निवडणूक लढविली.

उद्याच्या मतमोजणीपूर्वी आलेले कल हे आमदार संदीप क्षीरसागर यांना दिलासा देणारे आहेत. नगराध्यक्ष पदासह सत्तेच्या चाव्या त्यांच्याच हाती जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता निकालात मतदार कोणाचे पार्सल पॅक करणार याचा फैसला काही तासांतच होणार आहे. मराठवाड्यातील सर्वात मोठ्या बीड नगर पालिकेवर मागच्या 30 वर्षांपासून क्षीरसागरांचे वर्चस्व आहे. यावेळी 50 वरुन 52 नगरसेवक झालेली निवडणूक अगदीच रंगतदार झाली.

इतिहासात प्रथमच भाजपला सर्व जागा लढता आल्या. कारण, डॉ. योगेश क्षीरसागर यांनी ऐनवेळी भाजपचा (BJP) तंबू गाठला. बीडचे पालकमंत्री असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांचे लक्ष या निवडणुकीवर होते. पण, ऐनवेळी फुट पडल्यामुळे आमदार विजयसिंह पंडित यांना त्यांचे होम पीच गेवराई सांभाळतानाच बीडची धुराही सांभाळावी लागली.

डॉ.योगेश क्षीरसागरांनी पक्ष सोडूनही ऐनवेळी पंडित यांच्यासह निरीक्षक असलेले माजी आमदार संजय दौंड, जिल्हाध्यक्ष राजेश्‍वर चव्हाण, युवक जिल्हाध्यक्ष बळीराम गवते या टिमने यशस्वीरित्या शिवसेना, शिवसंग्रामला सोबत घेत सर्व ठिकाणी उमेदवार उभा केले.

Beed Election .jpg
Ashok Chavan Vs Hemant Patil: आमचे तीन आमदार,पन्नास टक्के जागा द्या, शिवसेनेची मागणी, अशोक चव्हाण पूर्ण करणार की धुडकावणार ?

तर, क्षीरसागर गळाला लागल्याने भाजपला बीडमध्ये प्रथमच सर्व जागा लढविता आल्याने मंत्री पंकजा मुंडे यांचाही हुरुप वाढला. पण, निवडणुकीच्या स्थानिक प्रचारात पंडित - डॉ. क्षीरसागर यांच्यातील वाक् युद्ध शेवटपर्यंत रंगले. पंडितांकडून क्षीरसागरांना 'बालक' तर डॉ. क्षीरसागरांकडून पंडितांना 'गेवराईचे पार्सल'असे टोमणे अगदी कालच्या शुक्रवार पर्यंत सुरु होते. बीडमध्ये खुद्द अजित पवारांनी दोन सभा घेतल्या.

पंकजा मुंडे यांनीही बीडमध्ये दोन दिवस घालविले. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनीही भाजपसाठी ताकद पणाला लावली. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही बीडमध्ये सभा झाली. इकडे महायुतीतील दोन मित्रपक्ष ताकद लावून एकमेकांविरुद्ध तुंबळ युद्ध खेळत असताना विरोधी पक्षातील आमदार संदीप क्षीरसागर यांनी शांतपणे आणि एकहाती निवडणुक लढविली. नगराध्यक्षपदासाठी लोकांमधील सामान्य चेहरा दिला.

Beed Election .jpg
NCP MLA Accident: मोठी बातमी: निवडणूक निकालाच्या आदल्या दिवशीच अजित पवारांच्या आमदाराला कारनं उडवलं, रुग्णालयात उपचार सुरू

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सोबतीला घेत सर्व जागाही ताकदीने लढविल्या. माजी आमदार सय्यद सलिम यांच्या साथीने वार्डनिहाय सभा आणि बैठका घेत स्वत:चा अजेंडा मांडला. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रचारासाठी राज्य पातळीवरचा एकही नेता बोलविला नाही.

आता मतदारांचा कौल नेमका कोणाच्या पारड्यात पडलेला आहे, हे रविवारी कळेल. पंडित व दोन्ही क्षीरसागर हे तिघेही बीडचे रहिवाशी नाहीत. मात्र, अनेक वर्षांपासून बीडमध्ये वास्तव्यास आहेत. त्यामुळे कोणाचे पार्सल बीडमध्ये राहते आणि कोणाच्या पार्सलची पॅकींग होते, याचा फैसला होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com