Beed Municipal Council: बीडमधील सत्तानाट्याचा मुंबईत शेवट? विजयसिंह पंडितांना नडणाऱ्या नगरसेवकांना तातडीने मुंबईला बोलावले

Beed NCP crisis News : सुनेत्रा पवारांनी बीड पालिकेतील सर्व नाराज नगरसेवक गट आणि नगराध्यक्ष गटाला मुंबईत बोलवले असल्याने त्याच ठिकाणी सर्व तोडगा निघणार की घडी विस्कटणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Beed municipal election results reshape local politics as BJP and NCP Sharad Pawar explore alliances
Beed municipal election results reshape local politics as BJP and NCP Sharad Pawar explore alliancesSarkarnama
Published on
Updated on

नितीन चव्हाण

Beed News : बीड नगरपरिषदेत सत्ता परिवर्तन होऊन अवघे सहा महिने पूर्ण होत नाहीत, तोच सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी टोकाला गेली आहे. बीड दौऱ्यावर आलेल्या उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा पवार यांची नाराज नगरसेवकाच्या गटाने भेट घेऊन गऱ्हाणे मांडले असले, तरी पालिकेतील या महानाट्याचा खरा तोडगा आता थेट मुंबईतच निघणार आहे. सुनेत्रा पवारांनी बीड पालिकेतील सर्व नाराज नगरसेवक गट आणि नगराध्यक्ष गटाला मुंबईत बोलवले असल्याने त्याच ठिकाणी सर्व तोडगा निघणार की घडी विस्कटणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गेल्या काही दिवसांपासून आमदार विजयसिंह पंडित यांच्याविरोधात ११ नगरसेवकांच्या नाराज गटाने पालिकेत उघडपणे तटबंदी उभारली आहे. उपनगराध्यक्ष विनोद मुळूक, गटनेते फारुख पटेल आणि नगरसेवक अमर नाईकवाडे यांच्या नेतृत्वाखाल हे नगरसेवक एकत्र आले आहेत. बीड दौऱ्यात या नगरसेवकांनी सुनेत्रा पवारांची भेट घेऊन चर्चा केली. मात्र, दौऱ्यातील वेळेभावी बीडमध्ये केवळ नोंद घेण्यात आली असून, वादाचा अंतिम निसरा करण्यासाठी सर्वांना मुंबईत समोरासमोर बसवण्याचा निर्णय पालकमंत्र्यांनी घेतला आहे.

अजितदादांनी पाहिलेले 'बीडची बारामती' करण्याचे स्वप्न साकार करायचे असेल, तर अंतर्गत गटबाजी मोडून काढावीच लागेल. त्यामुळे मुंबईतील ही बैठक बीड पालिकेतील सत्ताधाऱ्यांची विस्कटलेली घडी पुन्हा बसवण्यासाठी अत्यंत दिशादर्शक आणि निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Beed municipal election results reshape local politics as BJP and NCP Sharad Pawar explore alliances
Yogesh Kshirsagar : बीड नगरपालिकेच्या सत्तांतरासाठी क्षीरसागर लागेल कामाला, मुंबईत मंत्री पंकजा मुंडे यांच्याशी बंददाराआड चर्चा!

बीड पालिकेतील नाट्याचा शेवट आता मुंबईत होणार आहे. त्यासाठी बीड नगरपालिकेतील नाराज असलेला नगरसेवकांचा गट अन् नगराध्यक्ष गटाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून बोलावणे आले आहे. त्यामुळे आता ​बीडमधील नगरसेवकांच्या भेटीनंतर आता फायनल डील मुंबईतील बैठकीतच फुटणार आहे. त्यामुळे आता मुंबईत राजकीय समेट घडतो की नाराजीचा सूर कायम राहतो, याकडे राजकीय वर्तुळाच्या नजरा लागल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com