Uddhav Thackeray: विदर्भात 'आयाराम-गयाराम' सुरू; ठाकरेंचा सहसंपर्क प्रमुख शिंदेंच्या शिवसेनेत

Uddhav Thackeray group leader Gajanan Patil Wakode join eknath shinde group:अमरावतीत ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. उद्धव ठाकरे यांच्या गटाचे सहसंपर्क प्रमुख गजानन पाटील वाकोडे यांनी राजीनामा दिला आहे. त्यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.
Gajanan Patil Wakode join eknath shinde group
Gajanan Patil Wakode join eknath shinde groupSarkarnama
Published on
Updated on

निवडणुका जवळ आल्या की पक्ष फोडाफोडीचे राजकारण सुरू होते. सध्या फोडाफोडीच्या राजकारणाची चर्चा विदर्भात रंगली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयाराम -गयाराम यांच्या संख्येत वाढ होत आहे.

अमरावतीत ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. उद्धव ठाकरे यांच्या गटाचे सहसंपर्क प्रमुख गजानन पाटील वाकोडे यांनी राजीनामा दिला आहे. त्यांनी आज शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.

एका पाठोपाठ एक जुने नेते सोडून जात असल्याने पक्षात मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे. माजी खासदार तसेच पोवार समाजाचे नेते शिशुपाल पटले यांनी गुरुवारी भाजपला रामराम ठोकला आहे. तर आज सहा वर्षानंतर भाजपला सोडचिठ्ठी देत गोंदियाचे माजी आमदार रमेश कुथे यांनी आज ठाकरे गटात प्रवेश करून घरवापसी केली आहे.

Gajanan Patil Wakode join eknath shinde group
Raj Thackeray: राज ठाकरेंनी 'ती' मोठी स्पेस गमावली नसती तर मनसेला सत्ता मिळालीही असती...

उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख गजानन पाटील वाकोडे हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावान शिवसैनिक होते. गजानन पाटील वाकोडे यांनी अचानक राजीनामा दिल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन त्यांनी मुंबई येथील वर्षा निवासस्थानी जात शिवसेनेत प्रवेश केला.त्यांच्या सोबत शिवसेना नेते माजी मंत्री आनंदराव अडसूळ, अभिजीत अडसूळ उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com