Beed News, 12 Oct : दसऱ्याच्या निमित्ताने राज्यात विविध पक्षांचे आणि समाजाकडून दसरा मेळाव्याते आयोजन करण्यात आलं आहे. बीडमधील (Beed) भगवान गडावरही परंपरेनुसार दसरा मेळवा पार पडला.
या मेळाव्याला भाजप नेत्या पंकजा मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी देखील हजरी लावली आहे. तर दुसरीकडे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी देखील नारायण गडावर दसरा मेळाव्याचं आयोजन केलं आहे.
त्यामुळे यावर्षी बीडमध्ये एकत्र दोन मेळावे पार पडत आहेत. जरांगे पाटील यांनी आपल्या मेळाव्यातून सरकारला इशारा देत मराठ्यांच्या मागण्या आचारसंहिता लागण्यापूर्व मान्य करण्याचा वेळ दिला आहे.
एकीकडे जरांगेंच्या (Manoj jarange Patil) दसरा मेळाव्याची चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे पंकजा मुंडे यांच्या मेळाव्याला ओबीसी आरक्षणासाठी लढा देणारे लक्ष्मण हाके यांनी हजेरी लावली. यावेळी आपल्या भाषणात पंकजा मुंडे यांनी हाके यांची ओळख करुन देताना केलेल्या वक्तव्याची आता जोरदार चर्चा रंगली आहे.
दसरा मेळाव्याच्या व्यासपीठावरुन पंकजा मुंडे (Pankaja Munde) भाषणात म्हणाल्या, "लक्ष्मण हाके म्हणजे गोंडस लेकरासारखे दिसतात. त्यांनी स्वत:हून इकडे येण्याचा निर्णय घेतला. माझ्या दसऱ्याला मी कोणालाही निमंत्रण देत नाही. पण लक्ष्मण हाके याठिकाणी आल्यानंतर त्यांनी भगवान बाबा आणि मुंडे साहेबांच्या स्मृतीला वंदन केलं मी त्यांचं स्वागत करते."
तर हाकेंचा उल्लेख गोंडस लेकरू असता करताच भगवान गडावर उपस्थित जनसमुदायाने एकच जल्लोष केल्याचं पाहायला मिळालं. तर पंकजा मुंडे यांनी याच मेळाव्यात त्यांचा मुलगा आर्यमान याची देखील ओळख करून दिली. स्टेजवर बसलेल्या आर्यमानला त्यांनी जवळ बोलावून घेत त्याची सर्वांशी ओळख करून दिली.
यावेळी त्या म्हणाल्या, "हा माझा मुलगा आर्यमान, भगवान बाबांच्या दर्शनाला आलाय. मी माझ्या मुलाला सांगितलं की, मला तुझ्यापेक्षा ही जनता जास्त प्रिय आहे. माझ्या निवडणुकीचा निकाल लागला तेव्हा माझ्या लेकरांनी जीव दिला. मीदेखील तुमच्यावर पोटच्या लेकरापेक्षा जास्त माया करते की नाही? असा प्रश्न उपस्थितांना करत तुम्ही घरच्यांपेक्षा जास्त जीव मला लावता, असंही पंकजा म्हणाल्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.