Majalgaon Assembly Election : पक्षात नसलेल्या उमेदवाराला तुतारी; शरद पवारांच्या राष्ट्रवादीत बंडखोरी

Sharad Pawar NCP: शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश झाल्यानंतर आडसकर यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती. परंतु ऐनवेळी भाजपचे विधानसभा प्रमुख असणारे मोहन जगताप यांना उमेदवारी दिल्यामुळे सोमवारी आडसकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.
NCP Sharad Pawar
NCP Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Beed News, 29 Oct : माजलगाव विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारीत अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. माजी आमदार राधा कृष्ण होके पाटील तयारी करत असतानाच रमेश आडसकर (Ramesh Adaskar) यांना पक्षात प्रवेश देण्यात आला.

मात्र, ऐनवेळी भाजप (BJP) विधानसभा प्रमुख मोहन जगताप यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. उमेदवारीची घोषणा होताच मुंबईतून आडसकर माजलगावला आले आणि शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला.

मागील 23 दिवस आमच्यासोबत नगदी-उधारीचा खेळ खेळण्यात आला. मात्र ऐनवेळी आमचा रूमाल बदलण्यात आला, असा आरोप रमेश आडसकर यांनी केला. सध्याचं राजकारण पैशांभोवती फिरत असून सरस वाटलो तरच मतदान करा असे आवाहन त्यांनी मतदारांना केलं आहे.

त्यांच्या समवेत माजी आमदार मोहनराव सोळंके, राधाकृष्ण होके पाटील, हरिभाउ सोळंके, अशोक होके पाटील, बबन सोळंके, दिपक मेंडके, विठ्ठल लगड, अभय होके, तन्मय होके, सुरेश दळवे यांचेसह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.

NCP Sharad Pawar
Beed Assembly Election: मराठवाड्यात मातब्बर राजकीय घराण्यातील तीन काका-पुतणे रिंगणात

शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश झाल्यानंतर आडसकर यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती. परंतु ऐनवेळी भाजपचे (BJP) विधानसभा प्रमुख असणारे मोहन जगताप यांना उमेदवारी दिल्यामुळे सोमवारी आडसकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.

विधानसभा निवडणुकीस अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या टप्प्यात माजलगाव मतदारसंघात अनेक ट्विस्ट घडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाकडून ग्रीन सिग्नल मिळाल्याने मागच्या काही दिवसांपासून माजी आमदार राधाकृष्ण होके पाटील मतदारसंघात दौरे करत होते.

NCP Sharad Pawar
Zeeshan Siddiqui : झिशान सिद्दिकींना पुन्हा जीवे मारण्याची धमकी; सलमानच्या नावाचा उल्लेख करत केली मोठी मागणी

तर, मागच्या आठवड्यात शरद पवार यांच्या उपास्थितीत रमेश आडसकर यांचा प्रवेश झाला. रमेश आडसकर यांचा निसटता पराभव झाला होता. यानंतर मागील पाच वर्षे त्यांनी मतदारसंघामध्ये जनतेशी संपर्क ठेवला होता. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारपक्षाकडून उमेदवारी निश्चित मानली जात होती. होके पाटील यांनीही आडसकर यांच्या नावाला संमती दिली होती. मात्र, पक्षात प्रवेश नसलेल्या जगताप यांनी उमेदवारी दिल्याने आडसकर अपक्ष रिंगणात उतरले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com