Zeeshan Siddiqui : झिशान सिद्दिकींना पुन्हा जीवे मारण्याची धमकी; सलमानच्या नावाचा उल्लेख करत केली मोठी मागणी

Zeeshan Siddiqui And Salman Khan Death threat : काही दिवसांपूर्वी बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. हत्या करण्याआधी त्यांना जीवे मारण्याची धमकी आली होती. मात्र, तरीही त्यांच्या सुरक्षेत कसूर राहिल्यांने त्यांना जीव गमवावा लागला होता.
Baba, Siddique, Salman Khan, Zeeshan Siddique
Baba, Siddique, Salman Khan, Zeeshan SiddiqueSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांचे पुत्र आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार झिशान सिद्दीकी यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे.

या धमकीमुळे एकच खळबळ उडाली असून पुन्हा एकदा सिद्दीकी कुटुंबियांच्या सुरक्षिततेचा मुद्दा चर्चेत आला आहे. नुकतंच दसऱ्याच्या दिवशी बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.

हत्या करण्याआधी त्यांना जीवे मारण्याची धमकी आली होती. मात्र, तरीही त्यांच्या सुरक्षेत कसूर राहिल्यांने त्यांना जीव गमवावा लागला होता. अशातच आता बाबा सिद्दीकी यांचे पुत्र आमदार झिशान सिद्धीकी (Zeeshan Siddique) यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे.

Baba, Siddique, Salman Khan, Zeeshan Siddique
Srinivas Vanaga : शिंदेंसाठी ठाकरेंची साथ सोडली, तरी दोनदा तिकीट कापलं, उद्विग्न वनगा 15 तासांपासून 'नॉट रिचेबल'

झिशान यांच्या वांद्रे पूर्व येथील जनसंपर्क कार्यालयातील फोनवर शुक्रवारी सांयकाळी हा धमकीचा फोन आल्याची माहिती आहे. तर धमकावणाऱ्या व्यक्तीने झिशान सिद्धीकी आणि अभिनेता सलमान खान (Salman Khan) यांना मारण्याची धमकी देत पैशांची मागणी केली आहे. याप्रकरणी निर्मलनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com