Beed News, 06 Feb : सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांची हत्या करतानाचे भयानक आणि काळीज पिळवटून टाकणारे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हे व्हायरल फोटो पाहून भल्याभल्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख देखील फोटो पाहून ढसाढसा रडले होते.
तर संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येचे फोटो इतरे भयानक होते की ते पाहून धक्का बसल्याने 23 वर्षीय अशोक हरिभाऊ शिंदे नावाच्या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. देशमुख यांना क्रूर पद्धतीनं मारल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे.
या घटनेचा निषेध करण्यासाठी ठिकठिकाणी बंद देखील पाळले जात आहेत. अशातच आता आपल्या वडिलांच्या हत्येचे फोटो पाहिल्यानंतर संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुखने (Vaibhavi Deshmukh) आपली पहिली प्रतिक्रिया दिली. "मला माझ्या मुला-मुलीसाठी तरी जगू द्या, वडिलांचे हे शब्द ऐकल्यानंतर अश्रू अनावर होत आहेत. आज ते घरी येत नाहीत तरी आम्ही त्यांची रात्रीपर्यंत वाट पाहतोय, अशा शब्दात आपल्या भावना वैभवीने व्यक्त केल्या.
माध्यमांशी बोलताना वैभवी म्हणाली, आमच्यावर आलेलं दुःख कधीच न संपणार आहे. ते आमच्या घरातील प्रमुख होते. फोटो बघून आमची लढण्याची क्षमता आणि सहनशीलता संपत आहे. हत्येच्या दिवसापासून आजंही दुःख तेवढंच आहे आणि यापुढेही तेवढंच राहिल, असं ती यावेळी म्हणाली.
तर "आम्ही आता दुःख सुद्धा व्यक्त करू शकत नाही कारण वडिलांना न्याय द्यायचा आहे. शिवाय हे सर्व कोण घडवून आणतय हा प्रश्न आमच्या समोरही आहे. या फोटोंमध्ये माझ्या वडिलांना अमानुष पद्धतीने मारहाण केली. मृतदेह समोर असताना तुम्ही हसताय धिंगाणा करताय, फोटो काढताय त्याचं आम्हाला किती दुःख आहे"; असं म्हणत तिने या फोटोतील आरोपींच्या कृत्यावर संताप व्यक्त केला.
तर ही घटना खंडणीमुळे झाली असल्याचं सांगतं. ते लोक इतके अमानुषपणे कृत्य करत आहेत. त्याच्यामागे कुणाचा हात आहे आणि खंडणी नेमकी कोणासाठी जाते? हे सर्व केलं त्या लोकांना कोणी पाठवलं होतं? असे अनेक प्रश्न वैभवीने यावेळी उपस्थित केले. शिवाय ज्यांनी खंडणी मागायला सांगितली त्यांना सहआरोपी करा आणि माझ्या वडिलांना न्याय मिळाला पाहिजे आणि आरोपींनी कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे एवढीचं आमची मागणी असल्याचंही ती यावेळी म्हणाली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.