Beed News : शिवसेना उपजिल्हाप्रमुखांवर जीवघेणा हल्ला; नातेवाईकांना जीवे मारण्याच्या धमक्या

Shiv Sena News : ज्ञानेश्वर खांडे यांनी दिलेल्या जबाबावरुन बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात १२ संशयितांवर जीवे मारण्याच्या प्रयत्नाच्या कलमाखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे.नातेवाईकांनाही जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचे ज्ञानेश्वर खांडे यांच्या आईने म्हटले आहे.
Beed Shiv Sena Leader Attack News
Beed Shiv Sena Leader Attack NewsSarkarnama
Published on
Updated on

Beed News : शिवसेना (Shiv Sena) उपजिल्हा प्रमुख ज्ञानेश्वर खांडे (Dnyaneshwar Khande) यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला असून त्यांच्या हात आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर पुण्याच्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मात्र, या प्रकरणात गुन्हा दाखल झालेले आरोपींवर कारवाई केलली नाही. आता त्यांच्याकडून नातेवाईकांनाही जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचे ज्ञानेश्वर खांडे यांच्या आईने म्हटले आहे.

याबाबत भागीरथी खांडे यांनी बुधवारी पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांची भेट घेऊन निवेदन दिले. ज्ञानेश्वर खांडे यांच्यावर ग्रामपंचायत लढविल्याचे व पक्षाचे पद घेतल्याच्या कारणावरुन जीवघेणा हल्ला झाला. लाकूड, लोखंडी रॉडने त्यांना जबर मारहाण करण्यात आली.

ज्ञानेश्वर खांडे यांनी दिलेल्या जबाबावरुन बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात १२ संशयितांवर जीवे मारण्याच्या प्रयत्नाच्या कलमाखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यामध्ये शिवसेना जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे यांच्यासह त्यांचे भाऊ गणेश खांडे व नामदेव खांडे यांच्यासह गोरख शिंदे, बाबा पाटोळे, सुनिल पाटोळे, कृष्णा पाटोळे, लाला दुनघव यांच्यासह इतर अनोळखी चौघांचा समावेश आहे.

Beed Shiv Sena Leader Attack News
SP Manifesto: रेशनकार्डधारक कुटुंबाला मिळणार ५०० रुपयांचा मोबाइल डेटा; सपाच्या जाहीरनाम्यात आश्वासनांचा पाऊस!

गुन्हा नोंद होऊन पाच दिवस लोटले तरी अद्याप पोलिसांनी एकही संशयित आरोपींना अटक केलली नाही. आता संशयितांकडून ज्ञानेश्वर खांडे यांच्या नातेवाईकांना देखील जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. तुझ्या पोराला जसे मारले तसे तुम्हाला देखील जीवे मारुन टाकू अशा धमक्या कुंडलिक खांडे, त्यांचे भाऊ हरिभाऊ खांडे व इतर लोक देत असल्याचे ज्ञानेश्वर खांडे यांच्या आई भागीरथी खांडे यांनी पोलिस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com