Teacher Assault FIR : मुलीला वर्गात का उभं केलं? वडील-भावाकडून शिक्षकाला मारहाण, बीडमध्ये गुन्हा दाखल

Teacher allegedly assaulted in Parli over student being made to stand in class; two booked : परळी वैजनाथमधील वैद्यनाथ इन्स्टिट्यूटमधील प्रकार; शिक्षकाच्या तक्रारीनंतर मंचक गीते आणि शुभम गीते यांच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा
Teacher Assault FIR
Teacher Assault FIRSarkarnama
Published on
Updated on

Beed teacher assault case : विद्यार्थिनीला वर्गात उभे केल्याच्या कारणावरून तिच्या वडिलांनी आणि भावाने शिक्षकाला शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथे घडली.

या प्रकरणी शिक्षकाच्या तक्रारीवरून दोघांविरुद्ध परळी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परळी वैजनाथ शहरातील विद्यानगर परिसरात वैद्यनाथ इन्स्टिट्यूट ही संस्था असून येथे नर्सिंगसह विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शिक्षण दिले जाते. या संस्थेत जहीर अहमद मोहम्मद इस्माईल हे शिक्षक (Teacher) म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या वर्गात नम्रता गीते ही विद्यार्थिनी शिक्षण घेत आहे.

28 ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास जहीर अहमद हे विद्यार्थ्यांना (Student) शिकवत होते. त्यावेळी नम्रता गीते हिला वर्गात उभे करण्यात आले होते. याच कारणावरून तिचे वडील मंचक गीते आणि भाऊ शुभम गीते हे वर्गात आले.

Teacher Assault FIR
IAS officer arrested : KPSC भरतीतील कथित गैरप्रकार; IAS अधिकारी ज्ञानेंद्र गंगवार यांना CIDकडून अटक

शिक्षकाने दिलेल्या तक्रारीनुसार, दोघांनी ‘माझ्या मुलीला जाणूनबुजून वर्गात का उभे केले?’ असा सवाल करत त्यांच्याशी वाद घातला. त्यानंतर शिवीगाळ करत गळा पकडून मारहाण केल्याचा आरोप शिक्षकाने केला आहे. या प्रकारामुळे वर्गात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

Teacher Assault FIR
AAP leader murder : भर बाजारात AAP नेत्याची गोळ्या झाडून हत्या; नगरपंचायत निवडणुकीच्या वादातून हल्ला?

शिक्षकाच्या तक्रारीवरून पोलिसांत गुन्हा

या घटनेनंतर जहीर अहमद मोहम्मद इस्माईल यांनी परळी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून मंचक गीते आणि शुभम गीते यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून तपास सुरू

दरम्यान, विद्यार्थिनीला वर्गात उभे करण्यामागील नेमके कारण काय होते आणि या घटनेबाबत विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांची भूमिका काय आहे, याबाबतची माहिती समोर आलेली नाही. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com