Postage Stamp Black Market : पोस्ट ऑफिसचं ‘तिकीट’ बनलं काळाबाजाराचं सोनं! मुंबई पोलिसांची दिल्लीमध्ये थेट धडक, टोळीचा भांडाफोड

Mumbai Police bust inter-state fake postage stamp gang : टपाल तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या टोळीतील दोन प्रमुख आरोपींना मुंबई पोलिसांनी दिल्लीतून अटक केली.
Rs 8 crore counterfeit postage stamp scam uncovered in Mumbai
Rs 8 crore counterfeit postage stamp scam uncovered in MumbaiSarkarnama
Published on
Updated on

Counterfeit Stamp Scam 2026: देशभर पसरलेल्या कोट्यवधींच्या टपाल तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या टोळीतील दोन प्रमुख आरोपींना मुंबई पोलिसांनी दिल्लीतून अटक केली. मोहम्मद शहाबुद्दीन शेख आणि वीरेंद्र प्रसाद, अशी त्यांची नावे असून, त्यांच्याकडून 27.84 कोटींची 20 ते 200 रुपये मूल्य असलेली बनावट टपाल तिकिटे जप्त करण्यात आली.

टपाल निरीक्षक आशुतोष कुमार यांनी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये बनावट तिकिटांची तक्रार दिली होती. त्यानुसार मुंबईतील (Mumbai) माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिसांनी गुन्हा नोंदवला. अशी तिकिटे देशभर विक्री होत असल्याचा संशय होता. बनावट टपाल तिकिटे देशभर मागणीप्रमाणे वितरित करणारी टोळी असल्याचा संशय मुंबई पोलिसांना आला. त्यानुसार पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली.

मुंबई पोलिसांच्या प्राथमिक तपासात राकेश बिंद (वय 42), शमशुद्दीन गफ्फार अहमद (वय 35) आणि शाहीद रझा (वय 35) या तीन आरोपींना बिहारमधून (Bihar) अटक करण्यात आली. अटक आरोपींनी मुख्य सूत्रधाराच्या मदतीने कोट्यवधींची बोगस टपाल तिकिटे छापून ती मागणीप्रमाणे देशभर विकल्याची माहिती दिली.

Rs 8 crore counterfeit postage stamp scam uncovered in Mumbai
ShivsenaUBT Vs BJP : मोदी-ठाकरे नावांवरून रणांगण पेटलं! ‘चोर है’च्या घोषणा; भाजप-ठाकरसेना नगरसेवक आमने-सामने

या आरोपींची बँक खाते तपासल्यावर, तिथं गफार आणि रझा यांच्या बँक खात्यांत सात ते आठ कोटींचे व्यवहार आढळले. या तिघांच्या अटकेनंतर मुख्य आरोपी शेख व प्रसाद पसार होते. अटकेच्या भीतीने ते सतत ठावठिकाणा बदलायचे.

वरिष्ठ निरीक्षक योगेश साबळे यांच्या मार्गदर्शनाखालील सहाय्यक निरीक्षक धनेश सातार्डेकर आणि पथकाने या दोघांचा दिल्लीतील नेमका ठावठिकाणा शोधून काढला. या पथकाने तब्बल दोन आठवडे पाळत ठेवून आरोपींना दिल्लीतून अटक केली.

Rs 8 crore counterfeit postage stamp scam uncovered in Mumbai
Baba Siddique Murder Case : ‘ऑर्डर फ्रॉम बिश्नोई’, बाबा सिद्दीकींवर गोळीबार; 27 आरोपींवर आरोपनिश्चिती, सलमान कनेक्शन चर्चेत

सुमारे 27 लाखांची बनावट तिकिटे जप्त

मोहम्मद शहाबुद्दीन शेख आणि वीरेंद्र प्रसाद या दोघांकडून मुंबई पोलिसांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र असलेली (10 रुपये), मदर तेरेसा यांचे चित्र असलेली (20 रुपये), मौलाना अब्दुल कलाम आझाद आणि सरदार वल्लभभाई पटेल यांचे चित्र असलेली (प्रत्येकी पाच रुपये), अशोक स्तंभाचे चित्र असलेली (100 व 200 रुपये) आणि रवींद्रनाथ टागोर यांचे चित्र असलेली (50 रुपये) तिकिटे जप्त केली आहेत. सुमारे 27.84 लाख रुपयांचे बनावट टपाल तिकिट जप्त केली आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com