Local Body Election 2025 : बीडमध्ये रणधुमाळी; परळीत मुंडे बहीण-भावाकडे नजरा, तर अंबाजोगाईत हाय होल्टेज लढत!

Beed District City Council Election : अंबाजोगाईत राजकिशोर मोदी व नंदकिशोर मुंदडा यांच्यात लढत होण्याची दाट शक्यता आहे. तर, परळी नगर पालिकेसाठी मंत्री पंकजा मुंडे व आमदार धनंजय मुंडे यांच्यात युती होते का? याकडे लक्ष लागले आहे.
Beed District Local Body Election 2025 News
Beed District Local Body Election 2025 NewsSarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. बीड जिल्ह्यात राजकीय तापमान वाढले असून परळीत मुंडे बहीण-भावाच्या निर्णयाकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

  2. अंबाजोगाईत देखील हाय व्होल्टेज सामना रंगणार असल्याची चिन्हं दिसत आहेत.

  3. मुंडे घराण्यातील अंतर्गत स्पर्धेमुळे बीडचे राजकारण पुन्हा चर्चेत आले आहे.

दत्ता देशमुख

Beed News : निवडणूक आयोगाने राज्यातील नगरपालिका आणि नगर पंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. बीड जिल्ह्यातील सहा नगरपालिकेत या निमित्ताने रणधुमाळी होणार आहे. मुंडे बहीण-भावाच्या परळीत काय होणार? यासह अंबाजोगाईतील हाय होल्टेज लढतींकडेही जिल्ह्याचे लक्ष असणार आहे.

नगर पालिका निवडणुकीसाठी दोन डिसेंबरला मतदान आणि तीन डिसेंबरला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होतील. मागच्या वेळी परळी नगर पालिकेत भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे व राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांच्या आघाड्यांत लढत झाली. त्यात भाजपला दारुण पराभव पत्करावा लागला. अलिकडे मुंडे भावंडांमधील मनोमिलन आणि महायुतीमुळे या ठिकाणी युती होईल, असे मानले जाते. अंबाजोगाईत राजकिशोर मोदी व नंदकिशोर मुंदडा यांच्यात लढत होण्याची दाट शक्यता आहे. तर, परळी नगर पालिकेसाठी मंत्री पंकजा मुंडे व आमदार धनंजय मुंडे यांच्यात युती होते का? याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.

मागच्या वेळी बीडमध्ये माजी नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर राष्ट्रवादीकडून तर त्यांचे बंधू रवींद्र क्षीरसागर हे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या आघाडीकडून आमने - सामने होते. या निवडणुकीत क्षीरसागर विजयी झाले. नगरसेवकांच्या जागांसाठी एमआयएम व आघाडीने चांगले यश मिळविले हेाते. माजलगाव नगर पालिका राष्ट्रवादी कॉंग्रेस, गेवराई आणि धारुर नगर पालिका भाजपच्या ताब्यात होती.

Beed District Local Body Election 2025 News
Beed politics : बीडमध्ये महायुतीत भूकंप; मुंडे बहीण-भाऊ पुन्हा आमने सामने?

तर, अंबाजोगाईत त्यावेळी आघाडीच्या माध्यमातून राजकिशोर मोदी यांच्या आघाडीकडून त्यांच्या भावजय रचना मोदी विजयी झाल्या होत्या. गेवराईत विधानसभा सत्तांतरामुळे आता राष्ट्रवादीकडून विजयसिंह पंडित यांनीही जोरदार तयारी केली असून भाजपकडून माजी मंत्री बदामराव पंडित आणि बाळराजे पवार सक्रीय आहेत. धारुरमध्ये सत्तांतराचे आमदार प्रकाश सोळंके व रमेश आडसकर यांचे प्रयत्न आहेत.

Beed District Local Body Election 2025 News
Dhananjay Munde : बीड जिल्हा अन् एका जातीला ज्या पाच- सहा नेत्यांनी बदनाम केलं त्याचा हा परिणाम! धनंजय मुंडेंचा आरोप

मोदी विरुद्ध मुंदडा सामना

आज निवडणुक कार्यक्रम जाहीर होताच मुंदडा समर्थकांनी नंदकिशोर मुंदडा यांच्या पोस्ट व्हायरल केल्या आहेत. पाच वेळा दिवंगत डॉ. विमल मुंदडा तर दोन वेळा त्यांच्या स्नुषा नमिता मुंदडा आमदार आहेत. तर, राजकिशोर मोदी स्वत: 15 वर्षे तर त्यांच्या भावजय १० वर्षे नगराध्यक्ष आहेत. शहराच्या राजकारणात त्यांची स्वतंत्र ओळख असून काँग्रेसमध्ये असताना मागच्या निवडणुकीत त्यांनी आघाडी करुन विजयश्री खेचली होती. त्यामुळे या निवडणुकीत भाजपचे मुंदडा व राष्ट्रवादीचे मोदी यांच्यात हाय व्होल्टेज लढत शक्य आहे.

असे आहे नगराध्यक्षपदाचे आरक्षण

बीड : अनुसुचित जाती महिला.

माजलगाव : नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिला. (ओबीसी महिला)

अंबाजोगाई : सर्वसाधारण (खुला)

परळी : सर्वसाधारण महिला

गेवराई : सर्वसाधारण महिला

धारुर : सर्वसाधारण (ओपन)

FAQs

प्रश्न 1: बीड जिल्ह्यात कोणत्या भागात राजकीय तापमान वाढले आहे?
उत्तर: परळी आणि अंबाजोगाई या ठिकाणी राजकीय वातावरण तापले आहे.

प्रश्न 2: मुंडे बहीण-भाव कोण आहेत?
उत्तर: पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे परळीतील राजकीय प्रतिस्पर्धी असून ते सध्या महायुतीमध्ये एकत्र आहेत.

प्रश्न 3: अंबाजोगाईतील लढतीचं वैशिष्ट्य काय आहे?
उत्तर: अंबाजोगाईत स्थानिक नेत्यांमध्ये हाय व्होल्टेज सामना अपेक्षित आहे.

प्रश्न 4: बीड जिल्ह्याचं राजकारण का चर्चेत आहे?
उत्तर: मुंडे घराण्यातील संघर्ष आणि आगामी निवडणुकीमुळे बीड पुन्हा चर्चेत आलं आहे.

प्रश्न 5: या लढतीचा महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होऊ शकतो?
उत्तर: बीडमधील निकालाचा प्रभाव राज्यातील राजकीय समीकरणांवर मोठ्या प्रमाणात पडू शकतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com