Manoj Jarange Patil : विजयी होताच 'या' आमदाराने मानले जरांगे पाटलांचे आभार, म्हणाले, "माझ्या विजयामध्ये..."

Sandeep Kshirsagar On Manoj Jarange Patil : महाविकास आघाडीच्या पराभवानंतर आता राज्यभरात लोकसभेला महाविकास आघाडीच्या विजयाला कारणीभूत ठरलेल्या मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटलांच्या फॅक्टरची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. लोकसभेप्रमाणे विधानसभेला जरांगे फॅक्टर चालला नसल्याचं बोललं जात आहे.
Manoj Jarange Patil
Manoj Jarange PatilSarkarnama
Published on
Updated on

Beed News, 24 Nov : विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती आले आहेत. सर्व एक्झिट पोलचे अंदाज खोटे ठरवत महायुतीने घवघवीत असं 200 पारचं बहुमत मिळवलं आहे. तर महाविकास आघाडीने सपाटून मार खाल्ला आहे. राज्यात महायुतीला 231 जागा मिळाल्या आहेत.

यामध्ये एकट्या भारतीय जनता पक्षाला 132 जागा मिळाल्या आहेत. भाजप पाठोपाठ शिवसेना शिंदे गटाला 57 जागा तर राष्ट्रवादी अजित पवार गटानं देखील मोठी मुसंडी मारल्याचं पहायला मिळत आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीने 41 जागा जिंकल्या आहेत.

तर दुसरीकडे महाविकास आघाडीला केवळ 50 जागा आल्या आहेत. ज्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्वाधिक 20, काँग्रेसच्या 16 जागा तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या 10 जागा आल्या आहेत.

महाविकास आघाडीच्या पराभवानंतर आता राज्यभरात लोकसभेला महाविकास आघाडीच्या विजयाला कारणीभूत ठरलेल्या मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटलांच्या (Manoj Jarange Patil) फॅक्टरची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. लोकसभेप्रमाणे विधानसभेला जरांगे फॅक्टर चालला नसल्याचं बोललं जात आहे.

Manoj Jarange Patil
Maharashtra Assembly Election 2024 Final Result : राज ठाकरेंनी भाजपला मदत केली नसती तर आज चित्र वेगळं असतं - राऊत

कारण मराठवाड्यातील मतदारांनी देखील महायुतीच्या बाजुने कौल दिला आहे. मात्र, बीडमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे संदीप क्षीरसागर (Sandeep Kshirsagar) यांनी मात्र आपला गड राखला आहे. महत्वाची बाब म्हणजे विजयी होताच क्षीरसागर यांनी मनोज जरांगे पाटलांचे आभार मानले आहेत. संदीप क्षीरसागर यांनी आपल्या विजयाचं श्रेय मनोज जरांगे पाटील यांना दिलं आहे.

Manoj Jarange Patil
CM Of Maharashtra : मुख्यमंत्री निवडीसाठी महायुतीत खलबत, अजितदादा-शिंदेंच्या आमदारांची तातडीची बैठक तर भाजपला दिल्लीतून सांगावा

"माझ्या विजयामध्ये मनोज जरांगे पाटील यांचा मोठा वाटा असून मी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहे. तसंच शरद पवारसाहेबांची देखील भेट घेणार आहे." असं ते म्हणाले आहेत. तसंच मुस्लिम समाजाचे धर्मगुरू नेमानी यांची देखील मी मुंबईमध्ये भेट घेणार असल्याचं क्षीरसागर यांनी सागितलं आहे. तर एकनिष्ठतेला किंमत देऊन शरद पवारांनी मला उमेदवारी दिली.

माझ्या विजयाचं श्रेय बीडच्या जनतेचं असल्याची भावना देखील त्यांनी यावेळी बोलून दाखवली आहे. याआधीही शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी जरांगे पाटलांचे जाहीर आभार मानले आहेत. लोकसभा निवडणुकीनंतरही खासदार बजरंग सोनावणे यांनी देखील जरांगेचे आभार मानत भेट घेतली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com