
Mumbai News : मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड याच्याविरोधात 'मकोका' अंतर्गत कारवाईचे निर्देश झाले. याचवेळी त्याचे पडसाद परळीत उमटले. संक्रांतीनिमित्ताने गजबजलेली बाजारपेठेत काही क्षणात समर्थकांनी बंद पुकारला, तर रस्त्यावर टायर जाळले. बसला टार्गेट करत काचा फोडल्या.
याशिवाय वाल्मिक कराडच्या आईने पोलिस ठाण्यासमोर बसून ठिय्या आंदोलन सुरू ठेवले आहे. बाजार समितीच्या इमारतीवर, टाॅवरवर समर्थकांनी चढून आंदोलन करत आहे. यातच एका महिलेने अंगावर ज्वलनशील तेल ओतून घेतलं. जमावबंदीचा आदेश असताना देखील, कराड समर्थक आक्रमक झाल्याने पोलिस प्रशासनाचा गोंधळ उडाला होता.
बीडमधील (BEED) मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येत सात जणांना अटक करण्यात आलेली आहे. यातील आरोपींविरोधात संघटीत गुन्हेगारी कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. 'मकोका' अंतर्गत आरोपींविरोधात कारवाई होत असतानाच, या कटामागे मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड आहे, असा ठपका ठेवण्यात आला.
खंडणीच्या गुन्ह्यात 31 डिसेंबरला सरेंडर झालेला वाल्मिक कराड याला केज न्यायालयाने 14 जानेवारीपर्यंत पोलिस (Police) कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला होता. पोलिस कोठडीत संपल्याने वाल्मिक कराड याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. खंडणीच्या गुन्ह्यात न्यायालयाने वाल्मिक कराड याला न्यायालयीन कोठडी सुनावली. तर कराड याला हत्येच्या कटात 'मकोका'मध्ये सीआयडीने वर्ग करून घेतले. कराड याला 'मकोका'मध्ये घेताच, त्याचे समर्थक परळीमध्ये आक्रमक झाले आहे.
वाल्मिक कराड याची आईनं परळीत पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. त्यात त्यांची प्रकृती खालवली आहे. वाल्मिक कराड याची पत्नी मंजिरी आणि त्याचे समर्थक पोलिस ठाण्यासमोर बसून घेतले. संक्रांतीनिमित्तानं गजबजलेली बाजारपेठेत समर्थकांनी क्षणात बंद पुकारला. काही समर्थकांनी बाजार समितीच्या इमारतीवर चढून आंदोलन केले. काही समर्थकांनी चौकातील टाॅवरवर चढले. समर्थक एवढे आक्रमक झाले होते की, रस्त्यावर टायर जाळून फेकले. तसंच एसटी बसला टार्गेट काचा फोडण्यात आल्या. यातच एका महिलेने अंगावर ज्वलनशील तेल ओतून घेतले. त्यामुळे पोलिस प्रशासनावर ताण येऊन गोंधळ उडाला होता.
वाल्मिक कराड याचे समर्थक एवढे आक्रमक झाले की, त्यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा करणारे भाजप आमदार सुरेश धस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर, खासदार बजरंग सोनवणे, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार प्रकाश सोळंके, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचे पोस्टर जाळून बोंबाबोंब आंदोलन केले.
वाल्मिक कराड याचे समर्थकांच्या आक्रमकपणामुळे परळीत अनेक भागात अस्थिरतेची परिस्थिती निर्माण झाली. यामुळे पोलिस प्रशासनावर ताण येऊन गोंधळ निर्माण झाला आहे. ही परिस्थिती हाताळण्यासाठी परळीत अनेक भागात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.