
Pune news : राज्याचे माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज सावंत सोमवारी दुपारनंतर पुण्यातून बेपत्ता झाल्याची बातमी समोर आली होती. त्यानंतर पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली. पोलीस यंत्रणेने लगेचच तपास कार्य सुरु केले. दरम्यान, या प्रकरणात आता नवी माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील ट्विस्ट संपला असून तानाजी सावंताचा मुलगा ऋषिराज सावंत व त्याचे दोन मित्र सोमवारी रात्री 9.30 वाजता पुणे विमानतळावर उतरले आल्याची माहिती पोलिसांनी दिली. यावेळी माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत देखील पत्रकार परिषदेला उपस्थित होते.
माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज सावंत पुणे विमानतळावरून बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली होती. दरम्यान, माहिती मिळताच पुणे पोलीस विमानतळावर दाखल झाले, त्यांनी तपास सुरू केला. मात्र आता या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे.
माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज अचानक पुणे विमनातळावरून बेपत्ता झाल्याची माहिती समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. पुणे पोलिसांच्या कंट्रोल रुमला तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांचा मुलगा ऋषिराज सावंत याला घेऊन दोन जण पुणे विमानतळावरुन फ्लाईटने गेल्याची माहिती देणारा फोन कंट्रोल रुमला आला होता. यानंतर पोलीस यंत्रणा सज्ज झाली.
आता या प्रकरणाबाबत पुणे पोलिसांनी मोठी अपडेट दिली. ऋषिराज सावंत आणि त्याचे दोन्ही मित्र हे परत पुणे विमानतळावर आले आहेत. ते सुखरुप आहेत, अशी माहिती पुणे पोलीस उपायुक्त रंजन कुमार शर्मा यांनी दिली. रंजन कुमार शर्मा आणि तानाजी सावंत यांनी पुन्हा पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली.
सोमवारी चारच्या सुमारास पुणे पोलीस कंट्रोल रुमला फोन आला की, माजी मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज सावंत यांना अज्ञात व्यक्तीने सोबत नेले आहे. त्यानंतर लगेच सर्व यंत्रणा सक्रिय झाल्या. सर्व माहिती घेतल्यानंतर त्यांनी एक चार्टड फ्लाईट घेतली होती. ती फ्लाईट बँकॉकच्या दिशेला रवाना झाली होती. या फ्लाईटची ट्रॅकिंग आणि इतर गोष्टी करुन ही फ्लाईट आता पुण्यात लँड झाली.
फ्लाईटमधील तीनही पॅसेंजर सुखरुप आहेत. ते कोणत्या कारणासाठी चालले होते याबद्दल विचारपूस सुरु आहे. विचारपूस केल्यानंतर ते काय उद्देशाने बँकॉक जात होते, घरी का सांगितलं नव्हतं, ती माहिती समोर येईल. या प्रकरणात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. चौकशीत काय सामोरे येणार त्यातून पुढचा तपास ठरवला जाईल, अशी प्रतिक्रिया पोलीस उपायुक्त रंजन कुमार शर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दरम्यान, यावेळी माहिती देताना तानाजी सावंत म्हणाले, घरगुती वाद नव्हता. मुलगा 30 ते 32 वर्षांचा झाला आहे. आमच्यात कधीही वाद झाला नाही. आम्ही सगळे सांप्रदाय पंथातील आहोत. रात्री व्यवस्थित गप्पा मारल्या, त्याने पहाटे साडेतीन वाजता रुद्रा अभिषेक केला. माझी पूजा सुरु होती. तो पटकन नेहमी सारखं कॅम्पसला निघून गेला. घरी काहीच न सांगता अचानक गेल्यामुळे आम्ही अस्वस्थ झालो होतो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.